शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आळंदीत हे चाललंय काय? इंद्रायणी नदीत आणखी एका महिलेने उडी मारून संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:48 IST

अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत संबंधित महिलेचा शोध सुरु आहे, सद्यस्थितीत इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह जास्त आहे

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत महिला पोलीसाने इंद्रायणीनदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज (दि. २९) आणखी एका वीस ते पंचवीस वर्षीय महिलेने इंद्रायणीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या घटनेने आळंदी पोलीस व नगरपरिषद प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान संबंधित महिलेचा मृतदेह शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.

 स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. इंद्रायणी नदीवरील भक्ती सोपान पुलाशेजारील नव्याने उभारण्यात आलेल्या स्कायवोक पुलावरून नदीपात्रात उडी मारली. दरम्यान आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग पथकाकडून इंद्रायणी नदीत संबंधित महिलेचा शोध सुरु आहे. सद्यस्थितीत इंद्रायणी नदीला पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे नवीन पुलाच्या खालच्या बाजूला तसेच अन्य ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. अद्याप आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव तसेच आत्महत्येचे कारण समजले नाही. आळंदी पोलीस घटनेचा तपास करत आहे.

रविवारी (दि. २५) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास एका महिलेने इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळील गरुड खांबावरून नदीत उडी मारली होती. त्यानंतर आळंदी पोलीस, आळंदी अग्निशमन विभाग, एनडीआरएफ यांच्या पथकाकडून इंद्रायणी नदीत शोधकार्य सुरु होते. अखेर बुधवारी (दि. २८) संबंधित पोलीस महिलेचा मृतदेह गोलेगाव येथील नदीपात्रात आढळून आला आहे.            अनुष्का केदार या पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत होत्या. सध्या पुणे ग्रामीण मुख्यालय येथे त्या नेमणुकीस होत्या. रविवारी सायंकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास इंद्रायणी नदीच्या नवीन पुलाजवळ गरुड खांबावरून नदीत उडी मारली. मात्र नदीत उडी मारण्यापूर्वी अनुष्का केदार यांनी देहूफाटा आळंदी येथे राहणाऱ्या त्यांच्या एका मित्राला फोन केला होता. मी इंद्रायणी नदीत उडी मारणार असल्याचे त्यांनी फोनवर म्हटले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राला बोलावून घेत त्याची चौकशी सुरु केली.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीWomenमहिलाPoliceपोलिसDeathमृत्यूindrayaniइंद्रायणीriverनदी