Video : “महिला आयोग अध्यक्षा आहे की महिलांचा अपमान करणारी प्रवक्ती?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 20:26 IST2025-10-31T20:26:22+5:302025-10-31T20:26:42+5:30

- चाकणकरांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीचे आंदोलन

"Is she the chairperson of the Women's Commission or a spokesperson who insults women?" | Video : “महिला आयोग अध्यक्षा आहे की महिलांचा अपमान करणारी प्रवक्ती?”

Video : “महिला आयोग अध्यक्षा आहे की महिलांचा अपमान करणारी प्रवक्ती?”

पुणे - एक महिला असूनही आत्महत्याग्रस्त महिलेबाबत असंवेदनशील आणि अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पद भूषविण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीने आंदोलन केले. यावेळी आंदोलक महिलांनी “चाकणकर महिला आयोग अध्यक्षा आहे की महिलांचा अपमान करणारी प्रवक्ती?” असा सवाल उपस्थित केला.

चाकणकर यांच्या गारमाळ (धायरी) येथे संपर्क कार्यालयासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनात ज्योती चांदरे, अमृत पठारे, रेखा कोंडे, स्वाती कथलकर, जयश्री भणगे , विद्या होडे , निकिता मारटकर, सरोज कार्वेकर, सुनिता खंडाळकर, छाया भोसले यांच्यासह महिला पदाधिकारी, युवती सेना व शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी “महिला आयोग अध्यक्ष का महिलांचा अवमान आयोग?”, “रुपाली चाकणकर राजीनामा द्या!” अशा घोषणा देण्यात आल्या.

रेखा कोंडे म्हणाल्या, “महिला आयोग हे महिलांच्या सन्मानासाठी असतो, महिलांचा अपमान करण्यासाठी नव्हे. रूपाली चाकणकर यांनी आपली भूमिका सिद्ध केली आहे. त्या महिलांच्या हक्कांची नाही, तर सत्ताधाऱ्यांच्या मुखपत्र आहेत!” त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा. महिलांचा अवमान करणाऱ्यांना महिला समाज माफ करणार नाही आणि शिवसेना शांत बसणार नाही.”

Web Title : रूपाली चाकणकर: महिला आयोग अध्यक्ष या महिलाओं का अपमान करने वाली प्रवक्ता?

Web Summary : शिवसेना (यूबीटी) ने रूपाली चाकणकर के एक मृत महिला के बारे में असंवेदनशील टिप्पणी के लिए इस्तीफे की मांग करते हुए विरोध प्रदर्शन किया। उन्होंने सवाल किया कि क्या वह महिलाओं की रक्षा करती हैं या उनका अपमान करती हैं, आरोप लगाया कि वह महिलाओं के अधिकारों से ज्यादा शासकों का पक्ष लेती हैं।

Web Title : Rupali Chakankar: Women's Commission Chair or Insulting Women's Spokesperson?

Web Summary : Shiv Sena (UBT) protested, demanding Rupali Chakankar's resignation for insensitive remarks about a deceased woman. They questioned if she protects women or insults them, alleging she favors rulers over women's rights.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.