शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
3
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
4
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
5
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
6
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
7
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
8
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
9
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
10
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
11
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
12
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
13
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
14
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
15
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
16
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी
17
विलीनीकरण नव्हे, एकत्र काम करणार! शरद पवारांनी दिला चर्चेला पूर्णविराम; 'इंडिया'ला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन
18
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
19
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
20
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा

‘आयआरसीटीसी’ देणार खासगी कंपन्यांना टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2019 12:20 PM

ठराविक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी यापूर्वी स्वतंत्र पर्यटन पॅकेज नव्हती...

पुणे : देशात पर्यटनाला जाण्यासाठी बहुतेक जण खासगी पर्यटन कंपन्यांना प्राधान्य देतात. प्रवास तिकिटापासून राहणे-खाणे, फिरण्याची विविध पॅकेज या कंपन्यांकडून दिली जातात. पण हा खर्च अनेकांच्या आवाक्याबाहेरचा असतो. तसेच काही ठराविक ठिकाणांपुरतीच ही पॅकेज असतात. हेच ओळखून इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅन्ड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहे. देशभरातील विविध ठिकाणांसाठीची पर्यटन पॅकेज तयार करण्यात आली असून त्यामध्ये धार्मिक स्थळांचाही समावेश करण्यात आला आहे. ‘आयआरसीटीसी’कडून भारत दर्शन, महाराजा अशा विविध विशेष पर्यटन रेल्वेगाड्या चालविल्या जातात. तसेच काही ठराविक ठिकाणांसाठीही विशेष गाड्या आहेत. संपूर्ण भारतभ्रमण करण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना या गाड्यांचा फायदा होतो. पण ठराविक पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी यापूर्वी स्वतंत्र पर्यटन पॅकेज नव्हती. तसेच या गाड्यांचा कालावधीही मोठा असतो. ‘आयआरसीटीसी’ने नुकतीच ही पॅकेज आणून सर्वसामान्यांना पर्यटनाची संधी उपलब्ध करून दिली आहे. या पॅकेजच्या  माध्यमातून रेल्वेचा ये-जा करण्याचा तिकीट खर्च, हॉटेल किंवा रेल्वेच्या गेस्ट हाऊसमध्ये राहणे, खाण्याची व्यवस्था, संबंधित ठिकाणी वाहन व्यवस्था अशा सुविधा या पॅकेजमध्येच मिळणार आहेत. याविषयी अधिक माहिती देताना ‘आयआरसीटीसी’चे पुण्याचे विभागप्रमुख गुरुराज सोना म्हणाले, की अनेक पर्यटकांना ठराविक ठिकाणांना भेट द्यायची असते. यासाठी स्वतंत्र पॅकेज नसतात. त्यामुळे पर्यटकांसाठी पहिल्यांदाच अशी पॅकेज सुरू करण्यात आली आहेत. .....एसी डब्यांमधील प्रत्येक ८ आसने आरक्षित

पुणे, मुंबईसह विविध स्थानकांतून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून संबंधित ठिकाणी जाता येईल. नियमित धावणाऱ्या या गाड्यांमधील ३ एसी आणि शयनयान एसी डब्यांमधील प्रत्येक ८ आसने आरक्षित असतील. पूर्वेकडील राज्य वगळता देशभरातील बहुतेक सर्व पर्यटनस्थळे, धार्मिक स्थळांचा यामध्ये समावेश आहे. 

सध्या पुणे व मुंबईतून हैदराबाद, केरळ, वैष्णोदेवी, शिर्डी, बालाजी, गोवा, तिरुपती, रामोजी फिल्मसिटी, जगन्नाथ धाम, म्हैसूर, उटी, हंपी, जबलपूर, कुर्ग, बेंगलुरू, मध्य प्रदेश, गुजरात, ग्वाल्हेर अशा विविध ठिकाणांसाठी पर्यटन पॅकेज उपलब्ध आहे. अत्यंत परवडणारी पॅकेज पर्यटकांना आकर्षित करतील. संकेतस्थळ तसेच अ‍ॅपवरूनही आरक्षण करता येणार आहे.  

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेtourismपर्यटनpassengerप्रवासी