मराठा क्रांती मोर्चा काढणार सासवडपासून संवादयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 16:08 IST2018-11-15T16:08:15+5:302018-11-15T16:08:30+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्ह्यातील संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेला सासवड येथून सुरुवात होणार असल्याची माहितीपुण्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली.

मराठा क्रांती मोर्चा काढणार सासवडपासून संवादयात्रा
पुणे - मराठा क्रांती मोर्चाच्या पुणे जिल्ह्यातील संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून संवाद यात्रा काढण्यात येणार आहे. या संवाद यात्रेला सासवड येथून सुरुवात होणार असल्याची माहितीपुण्यातील पत्रकार परिषदेत देण्यात आली. आरक्षणासह इतर प्रमुख मागण्यांसाठी मराठा समाजात जनजागृती आणि परिवर्तनासाठी ही यात्रा काढणार असल्याचे संघटनेकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय व्हावा, मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये, लाखोंच्या संख्येने एकत्र आलेल्या समाजात स्वाभिमान आणि स्वावलंबन जागृती व्हावी, मराठा क्रांती मोर्चातील निरपराध आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशा मागण्यांसाठी ही संवाद यात्रा काढण्यात येणार आहे.
या संवाद यात्रेदरम्यान, पुणे जिल्ह्यात कोपरा सभांचे आयोजन केले जाणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी संपूर्ण संवाद यात्रा ही मुंबईला विधानभवनावर जाऊन धडकणार आहे. या संपूर्ण संवाद यात्रेत महाराष्ट्रतील अनेक जिल्ह्यातील संवाद यात्रा सहभागी होणार आहेत. चारचाकी आणि दुचाकी घेऊन ही संवाद यात्रा मुंबईत जाऊन धडकणार असून, त्यावेळी चक्काजाम करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.
अशी असणार संवाद यात्रा
-संपूर्ण संवाद यात्रेत पुणे जिल्ह्यात कोपरा सभेच आयोजन असणार...
-महाराष्ट्रतील अनेक जिल्ह्यातील संवाद यात्रा ह्या सहभागी होणार...
-२६ नोव्हेंबर ला संपूर्ण संवाद यात्रा ही मुंबईला विधानभवनावर जाऊन धडकणार...
-चारचाकी आणि दुचाकी घेऊन ही संवाद यात्रा मुंबईत जाऊन धडकणार,चक्काजाम करण्याचा इशारा.
संवाद यात्रा कशासाठी ?
-मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय लवकर व्हावा...
-मराठा तरुणांनी आत्महत्या करु नये
-लाखोंच्या संख्येने एकत्र आलेल्या समाजात स्वाभिमान स्वावलंबन जागृतीकरिता
-मराठा क्रांती मोर्च्या च्या निरपराध आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्यासाठी...
-दुष्काळाच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, शासनाला गंभीर करण्यासाठी
-मराठा समाजाच्या मागण्यांच्या परिणामकारक अंमलबजावणी साठी विधानभवनाला जागणवण्यासाठी
-मराठा समाजाचे आंदोलनाचे सातत्य टिकवण्यासाठी