पुणे शहर पोलीस दलातील आणखी १७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 20:29 IST2020-11-03T20:29:19+5:302020-11-03T20:29:41+5:30
पुणे शहर पोलीस दलात शुक्रवारपासून बदल्यांचे सत्र सुरु..

पुणे शहर पोलीस दलातील आणखी १७ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या
पुणे : शहर पोलीस दलातील १७ पोलीस निरीक्षकांच्या मंगळवारी ( दि.३) अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात सार्वत्रिक बदल्यांमध्ये पुण्यात बदली झालेल्या ८ निरीक्षकांचा समावेश आहे. शहर पोलीस दलात शुक्रवारपासून बदल्यांचे सत्र सुरु झाले असून सोमवारपर्यंत ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.
पोलीस निरीक्षक, सध्याचे ठिकाण व नवीन पद : राम राजमाने (विश्रामबाग) दत्तवाडी वरिष्ठ निरीक्षक, अरुण वायकर (गुन्हे शाखा) सहकारनगर वरिष्ठ निरीक्षक, राजेंद्र पाटील (विशेष शाखा) चंदननगर, वरिष्ठ निरीक्षक, वैशाली चांदगुडे (गुन्हे शाखा) उत्तमनगर, वरिष्ठ निरीक्षक, वैशाली गंलाडे (विशेष शाखा) कोरेगाव पार्क, विजय पुराणिक (सहकारनगर) विशेष शाखा.
पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांची वाहतूक शाखेत करण्यात आलेली बदली रद्द करण्यात आली आहे.
पुण्यात बदलून आलेले पोलीस निरीक्षक : संजय बोटे (वर्धा) वाहतूक शाखा, उल्हास कदम (वर्धा) समर्थ, संजीवन जगदाळे (नानवीज, दौंड) अलंकार, सुनिल थोपटे (सिंधुदुर्ग) चंदननगर, दत्तात्रय भापकर (लाच लुचपत) आर्थिक गुन्हे शाखा, बाळासाहेब बडे (बीड) कोथरुड, प्रमोद गाडे (सोलापूर) वाहतूक शाखा, सावळाराम साळगांवकर (दहशतवाद विरोधी पथक) वानवडी़.
गुन्हे शाखेअंतर्गत करण्यात आलेल्या बदल्या :
शिल्पा चव्हाण -दरोडा व वाहन चोरी पथक, अनघा देशपांडे - प्रशासन, बालाजी पांढरे - खंडणी विरोधी पथक, सहायक निरीक्षक प्रकाश मोरे -युनिट २, सहायक निरीक्षक प्रसाद लोणारे -युनिट ५, उपनिरीक्षक अमोल गवळी - तपास व अभियोग कक्ष, उपनिरीक्षक शशिकांत शिंदे - युनिट ४, उपनिरीक्षक अनंत पिंगळे - युनिट २, सहायक निरीक्षक सतीश वाळके - आर्थिक गुन्हे शाखा, उपनिरीक्षक प्रिया टिळेकर - आर्थिक , गुन्हे शाखा.
शहर पोलीस दलात शुक्रवारपासून बदल्यांचे सत्र सुरु झाले असून सोमवारपर्यंत ४२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.