शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नदी स्वच्छतेसाठी एकवटले प्रशासन, स्वयंसेवी संस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 13:35 IST

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शहरामधून वाहणाऱ्या नद्या, ओढे-नाल्यांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.

ठळक मुद्देआयुक्त सौरभ राव यांनी केली रामनदी व बावधान येथील जिवंत झ-याची पाहणीविठ्ठल वाडी व अन्य ठिकाणी काही प्रमाणात काम सुरु

पुणे: शहराच्या जीवनवहिन्या म्हणून ओळख असलेल्या मुळा-मुठा व रामनदीला पुन्हा पूर्वीचे रुप देण्यासाठी व नद्यांच्या स्वच्छतेसाठी आता महापालिका प्रशासन, विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिक एकत्र आले आहे. रविवार (दि.२) रोजी आयुक्त सौरभ राव यांनी आपल्या संबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी नदी, पर्यावरण, पाणी यादी विषयांवर काम करणा-या विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांनी मिळून औंध-बावधान येथील रामनदी पात्र आणि येथील जिवंत झ-याला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी नदी स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने महापालिकेचे सर्व विभागाचे अधिकारी एकत्र येऊन ठोस उपाय-योजना करतील, असे आश्वासन राव यांनी यावेळी दिले.    केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये शहरामधून वाहणाऱ्या नद्या, ओढे-नाल्यांची स्वच्छता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यामुळेच महापालिका प्रशासनाने यावेळी शहरातील प्रामुख्याने मुळा-मुठा, रामनदीच्या स्वच्छचेसाठी मोठी मोहिम हाती घेतली आहे. यासाठी आयुक्तांनी संबंधित सर्व स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी यांची बैठक घेऊन स्वच्छ सर्वेक्षण, महापालिका करत असलेल्या उपाय-योजना व संस्थांकडून अपेक्षित कामांची माहिती दिली. यावेळी संस्थेच्या प्रतिनिधीने आयुक्तांना स्वत: काही ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्याची मागणी केली. त्यानुसार गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून दर रविवारी आयुक्त विविध ठिकाणी भेट देऊन नदी किनार, तेथे करावी लागणारी कामे याची माहिती घेत आहे. याचाच एक भाग म्हणून रविवार (दि.२) रोजी औंध, बावधन येथील रामनदीला भेट दिली.यावेळी जीवीत नदीच्या शैलजा देशपांडे, सागर मित्र, जल बिरादरीचे विनोद बावधनकर, जलदेवता सेवा अभियानाचे शैलेद्र पटेल, मिशन ग्राऊड वॉटरचे वैशाली पाटकर, रामनदी पुनरुज्जीवन करिता काम करणारे अनेक संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. तसेच महापालिकेचे विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.    याबाबत जीवीत नदीच्या शैलजा देशपांडे यांनी सांगितले की, महापालिका प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षण अभियानामुळे तरी किमान आता नदी स्वच्छतेसाठी पाऊल उचचली आहेत. याबाबत आयुक्त राव सकारात्मक असून, त्यांनी दोन रविवार प्रत्येक्ष येऊन भेट दिली आहे. त्यानुसार विठ्ठल वाडी व अन्य ठिकाणी काही प्रमाणात काम सुरु केले असून, रामनदीसाठी आता पुढाकार घेतला आहे. महापालिका प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि महत्वाचे स्थानिक नागरिक एकत्र येऊन नदी स्वच्छतेचा विचार करत आहेत. यामुळे आपल्या शहरातील नद्यांमध्ये नक्कीच काहीतरी चांगला बदल घडले.

टॅग्स :PuneपुणेriverनदीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानWaterपाणीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड