शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
3
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
4
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
5
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
6
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
7
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
8
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
9
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
10
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
11
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
12
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
13
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
14
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
15
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
16
निवडणूक आयोगाविरोधात विरोधक झाले आक्रमक; बॅनर्स फाडून थेट कचऱ्यात टाकले
17
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार
18
अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी
19
समलिंगी मातेच्या जोडीदारालाही ‘पितृत्व रजा’!
20
‘सहकारा’चा मंत्र गावागावांत पोहोचावा म्हणून..राष्ट्रीय सहकार धोरण २०२५, एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य

नागपूरऐवजी राजस्थानी संत्रा वेधतोय ग्राहकांचे लक्ष; पुण्याच्या बाजारपेठेत दररोज १० ते १५ टन आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 12:07 IST

मार्केट यार्ड फळबाजारात १५ दिवसांपासून १० ते १५ टन राजस्थान संत्र्यांची आवक होत आहे

पुणे : नागपूर आणि आंबट-गोड संत्रा हे समीकरणच आहे. त्यामुळे संत्रा म्हटले की, नागपूरचे नाव डोळ्यांसमोर येते. मात्र सद्य:स्थितीत राजस्थान येथून आलेली संत्री ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे बाजारात नागपूरच्या संत्रांऐवजी राजस्थानच्या संत्र्याला अधिक मागणी होत असून, या संत्र्याला ग्राहकांची पसंती अधिक मिळत आहे.मार्केट यार्ड फळबाजारात १५ दिवसांपासून १० ते १५ टन राजस्थान संत्र्यांची आवक होत आहे. ही संत्री नागपूर संत्र्यांच्या तुलनेत आकाराने लहान आहेत. ती रंगाने नारंगी असून चवीला गोड आहे. त्यामुळे राजस्थान येथून आलेल्या संत्र्यांची रोजच्या रोज विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.राजस्थान येथून विक्रीसाठी आलेल्या संत्र्याला घाऊक बाजारात प्रतिकिलोला २० ते ५० रुपये भाव मिळत आहे. या संत्र्यांचा हंगाम डिसेंबरअखेर ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत असतो. सध्या बाजारात राजस्थान संत्र्यांसह नागपूर, अमरावती येथून संत्र्यांची आवक होत आहे. बाजारात रोज ३० ते ५० टनांची आवक होत आहे. सद्य:स्थितीत संत्र्यांचा बहर सुरू आहे. हा बहर आणखी दीड महिना सुरू असणार आहे. अमरावतीचा संत्रा आकाराने मोठा आहे. या संत्र्याची साल जाड असून चव आंबट-गोड आहे. तसेच रंगाला हा संत्रा हिरवा आहे. त्यामुळे या संत्र्याचा दर कमी असला, तरी राजस्थाच्या संत्र्याला मागणी अधिक आहे.मृगबहरात दर चांगले जानेवारीच्या १५ तारखेनंतर मृगबहर हंगाम सुरू होणार आहे. या हंगामात संत्र्याची मोठ्या प्रमाणात आवक होईल. हा हंगाम जानेवारी ते एप्रिलपर्यंत असतो. मृगबहर या हंगामात शहरासह परराज्यातून मोठ्या प्रमाणात संत्र्याला मागणी वाढत असते. त्यामुळे दरही चांगले असणार आहेत.

मार्केट यार्ड बाजारात सद्य:स्थितीत संत्र्यांचे घाऊक बाजारातील दर मागील वर्षीच्या तुलनेत स्थिर आहेत. अमरावती संत्रा हा जाड साल आणि चवीला आंबट-गोड आहे. तसेच रंगाला हा संत्रा हिरवा आहे; तर राजस्थानी संत्रा हा चवीला गोट आणि रंगाने नारंगी असून चवीला गोड आहे. आकाराने लहान असल्याने राजस्थानी संत्र्याला मागणी चांगली आहे. - सोनू ढमढेरे, संत्रा अडते, मार्केट यार्ड

टॅग्स :PuneपुणेOrange Festivalआॅरेंज फेस्टिव्हलfruitsफळेMarket Yardमार्केट यार्डMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड