शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

प्रेरणादायी ..! दहावी पास पल्लवी हांडेंची महिन्याला लाखोंची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 12:32 PM

तीन-चार वर्षांतच साडेचार एकर शेती ते शेतकरी कंपनी स्थापन करून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल सुरू..

ठळक मुद्देसेंद्रिय शेतीला प्राधान्य : शेतमालाच्या ‘ऑनलाईन’ विक्रीचे ‘मॉडेल’ केले यशस्वी महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘स्वराज युवा आत्मा’ बचत गट सुरू शेतकरी महिला आर्थिक सक्षमशेतमाल लावण्यापूर्वीच हमीभाव

- सुषमा नेहरकर-शिंदे- पुणे : कुटुंबाची केवळ साडेचार एकर शेती. या शेतात पिकणारा बेभरवशाचा माल. निसर्गाच्या लहरीपणा व खता-औषधांचा वाढता खर्च यामुळे शेतीवर कुटुंब जगवणे कठीण होते. परंतु कृषी पदवी घेतलेला भाचा आणि नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने जुन्नर तालुक्यातील गोळेगाव येथील केवळ दहावी पास असलेल्या पल्लवी गणेश हांडे यांनी सेंद्रिय शेतीचा प्रयोग सुरू केला. सुरुवातीला केवळ दहा-वीस किलो शेतमालाची विक्री करणाऱ्या पल्लवी यांनी परिसरातील महिलांना एकत्र करून शेतमालाची थेट ‘ऑनलाईन’ विक्री सुरू केली. गेल्या तीन-चार वर्षांतच साडेचार एकर शेती ते शेतकरी कंपनी स्थापन करून महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल सुरू केली. यामुळे पल्लवी हांडे यांनी पंचक्रोशीत महिला शेतकऱ्यांसमोर वेगळा आदर्श उभा केला आहे. पल्लवी हांडे यांनी सांगितले, की चार वर्षांपूर्वी मी व कुटुंबातील लोक पारंपरिक पद्धतीने शेती करीत होतो. परंतु कुटुंबातील लोकांची संख्या आणि शेतीतून मिळणारे उत्पन्न यामध्ये ताळमेळ बसत नव्हता. तेव्हा कृषी पदवी घेतलेल्या भाच्याने सेंद्रिय शेती करण्याचा पर्याय सांगितला. सुरुवातीला पाच-दहा गुठ्यांमध्येच हा प्रयोग सुरू केला. घरचेच बी-बियाणे, घरीच गावरान गाईच्या शेण-ेमूत्रापासून तयार केलेले जीवामृत, इतर औषध यामुळे कमी खर्चात चांगले व विषमुक्त उत्पादन मिळत असल्याचे लक्षात आले. नंतर संपूर्ण साडेचार एकरामध्ये सेंद्रिय शेती सुरू केली. आमच्या शेतात पिकणाऱ्या दहा-वीस किलो सेंद्रिय मालाला चांगली किंमत मिळत असल्याचे लक्षात आले. नंतर आजूबाजूच्या काही महिलांना सांगितले. किमान घरी खाण्यासाठी तरी सेंद्रिय शेतीचा सल्ला दिला. यामधून १०-२० महिला शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ‘स्वराज युवा आत्मा’ बचत गट सुरू केला. त्याच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे प्रयोग सुरू केले. नारायणगावचे कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने सर्व महिलांना प्रशिक्षण दिले. मुंबईच्या कृषी प्रगती यांना मालाची विक्री सुरू झाली. टाटा कंपनीनेदेखील मदत केली. आता पल्लवी हांडे यांनी त्यांच्यासोबत असलेल्या २० हून अधिक महिला शेतकरी त्यांच्याच शेतात पिकवलेला सेंद्रिय शेतीमाल थेट आॅनलाईन अ‍ॅमेझॉन, स्टार बाजार, बिग बास्केट अशा मोठ्या कंपन्यांना विकतात. मालाचा दर्जा व उत्पादनातील सातत्य लक्षात घेऊन कंपन्यांकडून मोठी ऑर्डर मिळू लागली. वाढती मागणी लक्षात घेऊन गोळेगावलगतच्या जुन्नर, शिरूर तालुक्यांतील महिला शेतकऱ्यांनादेखील एकत्र करून ‘स्वतंत्र शेतकरी कंपनी’ स्थापन केली. आता या शेतकरी कंपनीच्या माध्यमातून खासगी कंपन्यांच्या मागणीनुसार कढीपत्ता, कोथिंबीरपासून विविध ३०-४० प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या आणि फळांचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले जाते. ........* शेतमाल लावण्यापूर्वीच हमीभाव 1 सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे व बाजारातील मागणी-पुरवठ्याच्या चढ उतारामुळे शेतमालाला कधी पैसे करून देईल व कधी मातीमोल दर मिळतील, सांगता येत नाही.

शेतकरी कंपनीच्या माध्यमातून शेतमाल लावण्यापूर्वीच शेतीला हमीभाव निश्चित केला जातो. यामुळे बाजारामध्ये कितीही दर पडले तरी सेंद्रिय शेती करणाºया शेतकºयांना किफायती दराची हमी मिळते. 

* शेतकरी महिला आर्थिक सक्षम

आमच्या गटातील महिला स्वत: शेतात पिकवलेल्या मालाची ऑर्डर मोबाईलवर घेतात. त्यानुसार मालाची तोडणी व पॅकिंग केले जाते. माल पोहोचवल्यानंतर महिलांच्या बँक खात्यात शेतमालाचे पैसे जमादेखील होतात. आमच्या बचत गटातील महिला महिन्याकाठी सरासरी १५ ते २० हजारांचा निव्वळ नफा कमावतात. यामुळे शेतकरी महिलादेखील खºया अर्थाने आर्थिक सक्षम झाल्या आहेत.- पल्लवी गणेश हांडे, आदर्श महिला शेतकरी.........

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरीWomenमहिला