शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

स्वाईन फ्लूच्या विषाणुंपासून मिळणार संरक्षण ; पुण्यातील डाॅक्टरचा अनाेखा मास्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 19:53 IST

संसर्गजन्य राेगांपासून संरक्षण मिळवणारा अनाेखा मास्क ससूनच्या डाॅक्टरांनी तयार केला असून येत्या काळात नागरिकांना ताे उपलब्ध हाेणार अाहे.

राहुल गायकवाडपुणे : स्वाईन फ्लू, क्षयराेग यांचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले अाहेत. त्याचबराेबर प्रदूषणामुळे हवा दूषित झाल्याने अनेक श्वसनाच्या अाजारांचा सामना नागरिकांना करावा लागत अाहे. यापासून संरक्षण करण्यासाठी ससूनच्या श्वसनराेग विभागाचे प्रमुख संजय गायकवाड यांनी दुहेरी संरक्षण करणारा मास्क तयार केला असून या संशाेधनाचे पेटंटही त्यांनी मिळवले अाहे.     स्वाईन फ्लू महाराष्ट्रात माेठ्याप्रमाणावर पसरत अाहे. विशेषतः नाशिक अाणि पुण्यात स्वाईन फ्लू चे सर्वाधिक रुग्ण अाढळून अाले अाहेत. या रुग्णांमध्ये दिवसेदिंवस वाढ हाेत अाहे. साधारण जून, जुलै हे महिने स्वाईन फ्लू पसरण्यासाठी अनुकूल असल्याने या काळात याचे अधिक रुग्ण अाढळतात. पुण्यात साेमवारी (1 अाॅक्टाेबर) 5 हजार सातशे 95 नागरिकांची स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात अाली अाहे. त्यातील 278 रुग्णांना टॅमी फ्लूचे अाैषध देण्यात अाले असून 11 रुग्णांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात अाले अाहे. स्वाईन फ्लू बराेबरच इतर हवेतून पसरणाऱ्या राेगांचे रुग्ण वाढत अाहेत. वाहनातून, कारखान्यांमधून निघणारा विषारी धूर यांमुळे नागरिकांच्या फुफ्फुसाची क्षमता कमी हाेत चालली अाहे. सध्या बाजारात विविध मास्क असले तरी ते इतके प्रभावी नाहीत. हाच विचार करत डाॅ. संजय गायकवाड अाणि त्यांच्या पत्नी विजया गायकवाड यांनी संशाेधन करुन पुर्नवापर करतायेण्याजाेगा रेस्पीरेटर मास्क तयार केला अाहे. या मास्कवर डाॅ. गायकवाड गेल्या तीन वर्षांपासून संशाेधन करत हाेते. या मास्कची बॅक्टेरिअल फिल्टरेशन एपीगसी ही शंभर टक्के अाहे. तसेच 0.3 मायक्राेनचे हवेतीन दूषित कण 95 टक्क्यांपर्यंत राेखले जातात. 

    मास्कची अावरण कायम वापरता येणार असून त्यातील फिल्टर केवळ 24 तासांनी बदलावा लागणार अाहे. या मास्कचे वैशिष्ट म्हणजे डबल फिल्टरेशन. या मास्कच्या वापरामुळे वापर करणाऱ्याला शुद्ध हवा मिळणार असून हवेतील जंतू तसेच प्रदूषणापासून संरक्षण हाेणार अाहे. त्याचबराेबर एखाद्याला श्वसनाचा अाजार असल्यास त्याने हा मास्क वापरल्याने ती व्यक्ती खाेकल्यास किंवा शिंकल्यास जंतू हे हवेत पसरणार नाहीत. त्यामुळे इतरांना श्वसनाचा अाजार हाेण्याचा धाेका टळू शकताे. डाॅ. गायकवाड यांनी या मास्कच्या चाचण्या घेतल्या असून त्या यशस्वी ठरल्या अाहेत. येत्या तीन महिन्यांमध्ये हा मास्क नागरिकांना बाजारात मिळू शकणार अाहे. 

    डाॅ. गायकवाड म्हणाले, सध्या हवेतील प्रदूषणाची पातळी कमालीची वाढत अाहे. त्यामुळे श्वसनाच्या राेगांनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्याही वाढत अाहे.  स्वाईन फ्लूचा धाेकाही वाढला अाहे. त्यामुळे यापासून संरक्षण मिळविण्यासाठी या मास्कची निर्मिती करण्यात अाली अाहे. हा मास्क दूषित हवेतल्या जैविक तसेत रासायनिक जतूंपासून संरक्षण देताे. हा पुर्नवापर करता येण्याजाेगा मास्क असल्याने वारंवार नागरिकांना ताे खरेदी करावा लागणार नाही. केवळ यातील फिल्टर बदलावे लागणार अाहे. तसेच यात डबल फिल्टरेशन असल्याने दुहेरी संरक्षण नागरिकांना मिळणार अाहे. खासकरुन लांबचा प्रवास करणारे , ट्रफिक पाेलीस, स्वच्छता कर्मचारी यांना या मास्कचा उपयाेग हाेणार अाहे. गर्दीच्या ठिकाणी हा मास्क वापरल्यास हवेतून पसरणाऱ्या राेगांपासून संरक्षण मिळवता येणार अाहे. 

टॅग्स :PuneपुणेHealthआरोग्यSwine Flueस्वाईन फ्लूnewsबातम्या