शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

Dattatray Bharane: कर्मयोगी सहकारी साखर कारखान्यात सत्ताधार्‍यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2021 19:05 IST

कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्‍यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे.

ठळक मुद्देइतर कारखान्यात कोणाचीही शिफारस नसली तरी सभासदत्व दिले जाते

कळस : इंदापूर येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप झालेल्या ऊसाला इतर कारखान्याच्या तुलनेत टनाला पाचशे रूपये कमी दिले आहेत, या कारखान्यात पारदर्शक काम होत नसून विरोधकांना नविन सभासदत्व नाहीच. मात्र दिवंगत सभासद वारसाच्या नोंदीही होत नाहीत सभासद शेतकर्‍यांवर अन्याय करुन कारखाना बिनविरोध झाल्याची आवई केली जात आहे. असा आरोप सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी केला आहे. 

कळस ता इंदापुर येथील दत्ता पेट्रोलियमच्या उद्धघाटन प्रसंगी ते बोलत होते, यावेळी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील, प्रतापराव पाटील, हनुमंत कोकाटे, सचिन सपकळ, भरतराजे भोसले, गणेश सांगळे,प्रसाद कांबळे उपस्थित होते. 

भरणे यांनी यावेळी सांगितले, कर्मयोगी साखर कारखाना शंकरराव भाऊच्या कारकिर्दीत चांगला चालत होता. मात्र आता त्यामध्ये पारदर्शक काम होत नाही.  कारखाना अडचणीत असून सभासदांना इतर कारखान्याच्या तुलनेत ५०० रूपये कमी दिले जात आहेत. कारखाना बिनविरोध झाला असल्याची आवई केली जाते. मात्र याठिकाणी नवीन सभासद करुन घेतले जात नाही. तसेच दिवंगत सभासद वारसाच्या नोंदी ही केल्या जात नाहीत.

इतर कारखान्यात कोणाचीही शिफारस नसली तरी सभासदत्व दिले जाते. त्यामुळे येथे सभासद शेतकर्‍यांवर अन्याय केला जात आहे. दौंड शुगर या खाजगी कारखान्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. मात्र याच खाजगी कारखान्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला जात आहे. कर्मयोगी कारखान्याच्या तुलनेत पाचशे रुपये अधिकचे दिले. मात्र या कारखान्यालाच केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशीला सामोरे जावे लागत आहे. याचा शेतकरी सभासदांनी निषेध केला पाहिजे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रNCPराष्ट्रवादी काँग्रेसSugar factoryसाखर कारखाने