पुणे: राष्ट्रवादी, भाजपप्रमाणे शिवसेनेचा विचार होणं गरजेचं आहे. किल्ले शिवनेरी मंत्रिमंडळात सामावून घेतलं नाही. शिवरायांचं नाव घेऊन सरकार येतं पण त्यांच्या जन्मस्थळाला डावललं जात आहे. किल्ले शिवनेरीला मंत्रिपदाची आशा आहे. सरकार येत्या काळात शिवनेरीचा विचार करतील अशी अपेक्षा आहे. शिवसेनेवर अन्याय करू नये अन्यथा महाराष्ट्र पुन्हा अस्थिर होईल अशी भीती आमदार शरद सोनवणे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
सोनवणे म्हणाले, शिवसेनेवर अशा पद्धतीने अन्याय होणार नाही याची काळजी सर्वच पक्षाने घायला हवी. मुख्यमंत्री उद्या पुण्यात येणार आहेत. यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आपलं महायुतीचे सरकार आहे जिथं भाजप आणि राष्ट्रवादीचा विचार केला जातो तिथं शिवसेनेचा देखील विचार होणं गरजेचं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
शिवनेरीला मंत्रिमंडळात सहभागी करून घेण्याबाबत सोनवणे म्हणाले, शिवजन्मभूमी मधून येणाऱ्या आमदारांना आतापर्यंत मंत्रिमंडळात सहभागी करून घेतल नाही. शिवरायांचं नाव घेऊन सरकार स्थापन होतात सरकार चालतात पण शिवजन्मभूमीचा सरकारला विसर पडतो अशी माझी धारणा होती. यावेळेस मंत्रिमंडळात मला सहभागी करून घेतील असं मला वाटतं आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं थोडं थांबा आपल्याला न्याय मिळेल मला दुसरा हाफ मध्ये आम्हाला न्याय मिळेल असं सध्यातरी वाटत आहे.
पालकमंत्री निधीबाबत प्राधान्य देतील
पुण्यासमोर जीबीएस या नवीन आजाराचं आव्हान आहे. पुण्यातील दोन हॉस्पिटलला सर्व उपचारांची व्यवस्था केली आहे. पालकमंत्री हेच अर्थमंत्री असल्यामुळे पुण्याला निधीच्या बाबतीत प्राधान्य देतील'