Injured by throwing substance in woman's mouth; Incident at Parvati Darshan | महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून केले जखमी; पर्वती दर्शन येथील घटना

महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून केले जखमी; पर्वती दर्शन येथील घटना

पुणे : विवाहानंतर माहेरी आलेल्या महिलेच्या तोंडावर द्रव्य टाकून तिला जखमी करण्याचा धक्कादायक प्रकार पर्वती दर्शन येथे घडला आहे.
याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी अबुझर आय्याज तांबोळी (रा. पर्वती दर्शन) याला अटक केली आहे. 

याबाबत कसबा पेठेतील एका १८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे लग्न झाल्यानंतर त्या पतीसह माहेरी सुट्टीवर आल्या आहेत. अबुझर याने त्यांना भेटण्याच्या बहाण्याने पर्वती दर्शन येथे बोलावले होते. त्याप्रमाणे त्या आल्या. फिर्यादी यांनी त्याला तू माझ्या मागे लागू नको़, आता माझे लग्न झालेले आहे, असे समजावून सांगत होत्या. त्यावेळी अबुझर याने तुझे आपने आपपर गुरुर है ना,देख मै अभी तेरा गुरुर तोड देता हू असे म्हणून त्याने हातात पाठीमागे ठेवलेले द्रव्य फिर्यादीच्या चेहऱ्यावर टाकून त्यांना जखमी केले. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने यांनी सांगितले की, आरोपीला आम्ही अटक केली आहे. तो एअर कंडिशन दुरुस्तीचे काम करतो. त्याने फिर्यादीच्या चेहऱ्यावर कोणते द्रव्य टाकले, हे समजून आले नाही. त्याबाबत आम्ही डॉक्टरांचा अहवाल मागविला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Injured by throwing substance in woman's mouth; Incident at Parvati Darshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.