सणासुदीच्या तोंडावर महागाईने मोडले सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 11:56 AM2020-10-08T11:56:40+5:302020-10-08T12:15:04+5:30

सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्याचा दसरा-दिवाळीच्या सणावर परिणाम होणार.. 

Inflation has broken the backs of ordinary housewives on the eve of the festival | सणासुदीच्या तोंडावर महागाईने मोडले सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे 

सणासुदीच्या तोंडावर महागाईने मोडले सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे 

Next
ठळक मुद्देतूरडाळ, खाद्यतेल, खोबर, भगर, चना डाळीच्या किंमतीत मोठी वाढभाजीपाला, कांदा- बटाटाही आवाक्याबाहेर 

पुणे : ऐन सणासुदीच्या तोडावर जीवनावश्यक, खाद्यपदार्थ, भाजीपाला, कांदा - बटाटा आदी वस्तूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक गणित बिघडले आहे. कोरोनामुळे बहुतेक सर्वच स्तरांतील लोकांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाल्यानंतर वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडेच मोडले आहे. 
        गेल्या सहा महिन्यांपासून पुण्यासह संपूर्ण राज्यावर कोरोनाचे संकट उभे आहे. यामुळे हजारो-लाखो लोकांचे जाॅब गेले असून, लाखो लोकांच्या पगारामध्ये कपात झाली आहे. त्यात वाढलेल्या महागाईमुळे नागरिक अधिकच हैराण झाले आहेत. खाद्यतेल, खोबरे, तुर डाळ, चनाडाळ, भगर आदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.  सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडल्याने त्याचा दसरा-दिवाळीच्या सणावर परिणाम होणार होणार आहे . 
      तीन-चार महिन्यांपूर्वी आवाक्यात आलेले दर पुन्हा एकदा गगनाला भिडले आहेत.  खाद्यतेलाचा १५ किलोचा डबा 1550 वरून थेट 1730-1750 वर जाऊन पोहचले आहेत. दररोजच्या जेवणातील तुरडाळ तर तब्बल 90-95 रुपयांवरून थेट 120 रुपये किलोच्या घरामध्ये गेले आहे. खोबर 140 रुपये किलो वरून 160 वर, चणाडाळ 50-55 वरून 75 रुपयांवर पोहचले आहे. शेंगदाणे दाखील 120 रुपये किलो झाले आहेत. भगर 80 रुपयावरून 95 पर्यंत वाढले आहे. तर भिजीपाला, कांदा-बटाटा या अत्यावश्यक वस्तूचे दर तर आवाच्या सावा वाढले आहे. यामध्ये यंदा मान्सून चांगला असल्याने गहू, ज्वारी, तांदूळ आणि अन्य कडधान्यांचे दर मात्र अद्याप स्थिर आहेत. या सर्व महागाईमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे.  त्यातच पेट्रोल व डिझेलचे दरही वाढले होते. यामुळे चोहोबाजूंनी सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे.  
...
खाद्यतेलाचे दर 180 रुपयांनी वाढ 
दसरा- दिवाळीच्या तोडावर खाद्यतेलाच्या 15 किलोच्या डब्यामागे तब्बल 180 रुपयांची वाढ झाली असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे कोथरूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व किरकोळ मालाचे व्यापारी सुनील घेईलोत यांनी सांगितले. यामुळे यंदाच्या सणासुदीवर महागाईची सावट असणार हे नक्की. 
----
अशी झाली दर वाढ ( प्रतिकिलो) 
खाद्यपदार्थ              जुनचे दर          ऑक्टोबरचे दर 
तेलडबा( 15 किलो)    1550                1730
तूरडाळ                     90-95              120
चणाडाळ                   55                    75
खोबरे                       140                  160
भगर                        80                    95
कांदा                        30-35              40-50
बटाटा                       20-25             35-40
भाजीपाला गड्डी      10-15              20-25 
गहू                          30-32               25 
ज्वारी                       स्थिर               स्थिर

Web Title: Inflation has broken the backs of ordinary housewives on the eve of the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.