कामशेत येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 18:31 IST2018-03-27T18:31:56+5:302018-03-27T18:31:56+5:30

मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कामशेत मधील रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला असलेल्या इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ हमाली काम करणाऱ्या संतोष पाटील (रा. पिंपरी रेल्वे स्टेशन ) याचा मृतदेह आढळून आला.

Indrayani river drowning one death at Kamshet | कामशेत येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

कामशेत येथे इंद्रायणी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू

इंद्रायणी नदीपात्रात बुडून एकाचा मृत्यू 
कामशेत : कामशेत रेल्वे स्टेशन बाजूला वाहणाऱ्या  इंद्रायणी नदीत सकाळच्या सुमारास अंघोळीसाठी गेलेल्या एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
संतोष पाटील (वय.२५, रा. पिंपरी रेल्वे स्टेशन)  आहे. असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २७) रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कामशेत मधील रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला असलेल्या इंद्रायणी नदीच्या घाटाजवळ हमाली काम करणाऱ्या संतोष पाटील (रा. पिंपरी रेल्वे स्टेशन ) याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. तो या घाटावर अंघोळीसाठी आला होता. अंघोळी दरम्यान, पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असून पुढील तपास कामशेत पोलीस करत आहे. 

Web Title: Indrayani river drowning one death at Kamshet