Indian Railway| मुंबई-पुणे लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 01:54 PM2023-01-12T13:54:51+5:302023-01-12T13:56:01+5:30

अज्ञात रेल्वेच्या खाली सापडून एका अनोळखी महिलेचा मृत्यू...

Indian Railway An unidentified woman died in a train collision on the Mumbai-Pune railway | Indian Railway| मुंबई-पुणे लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू

Indian Railway| मुंबई-पुणे लोहमार्गावर रेल्वेच्या धडकेत अनोळखी महिलेचा मृत्यू

Next

कामशेत (पुणे) : मुंबई-पुणे लोहमार्गावर अज्ञात रेल्वेची धडक बसून एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.११) रोजी घडली. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कान्हे गावच्या दरम्यान किलोमीटर क्रमांक १५२/३७ जवळ अज्ञात रेल्वेच्या खाली सापडून एका अनोळखी महिलेचा (अंदाजे वय ६०) मृत्यू झाला.

मयत अंगाने मजबूत, उंची सुमारे पाच फूट, रंगाने गोरी, गोल चेहरा व काळे पांढरे केस होते. मयत महिलेच्या अंगावर लाल रंगाचा ब्लाऊज व भगव्या रंगाची साडी नेसलेली आहे. तरी या संदर्भात कोणाला माहिती मिळाल्यास रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

Web Title: Indian Railway An unidentified woman died in a train collision on the Mumbai-Pune railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.