भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:02 PM2023-03-27T19:02:41+5:302023-03-27T19:26:03+5:30

पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाले

Indian cricketer Kedar Jadhav's father missing Filed a missing complaint with the police | भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधवचे वडील बेपत्ता; पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल

googlenewsNext

पुणे : भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याच्या कुटुंबाकडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याचे वडील  महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाल्याचे समजत आहे. पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास पासून ते बेपत्ता झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, केदार जाधव याचा परिवार कोथरूड भागात राहायला आहे. महादेव जाधव यांनी आज सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी रिक्षा घेऊन गेले मात्र आत्तापर्यंत त्यांचा काहीच शोध लागलेला नाही. त्यांच्या जवळ असलेला फोन सुद्धा बंद लागत आहे. जाधव कुटुंबीयांनी पोलिसांकडे हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. 

केदार जाधव याचा जन्म २६ मार्च १९८५ रोजी पुण्यात झाला. त्यांचे वडिलांचे नाव महादेव आणि आईचे नाव मंदाकिनी जाधव होते. त्यांचे मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील जाधववाडी हे आहे. केदार जाधव यांचे वडील १९८० मध्ये पुण्यात स्थलांतरित झाले होते. केदारचे वडील हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात लिपिक होते जे २००३ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. केदार जाधव यांचे वडील महादेव जाधव बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. महादेव जाधव सिटी प्राईड कोथरूड येथुन सकाळी रिक्षात बसून हरवले आहेत. 

Web Title: Indian cricketer Kedar Jadhav's father missing Filed a missing complaint with the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.