शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीत भारत जगात अव्वल अन् महाराष्ट्र तिसरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 13:26 IST

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची माहिती...

पुणे : साखर निर्यातीत भारत जगात अव्वल ठरला आहे. साखरेच्या निर्यातीत आपण विक्रम केला असून, दुसरा क्रमांक ब्राझील देशाचा आहे. तिसऱ्या क्रमांकावर आपल्या महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. इतर देशांना मागे टाकून एका राज्याने ही कामगिरी करून दाखविली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा हा देखील एक विक्रम झाला आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

द डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित वार्षिक साखर परिषदेत त्यांनी याविषयी माहिती दिली. त्यामुळे शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आल्याचेही त्यांनी नमूद केले. गायकवाड म्हणाले, साखर उत्पादनात १ लाख कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. आपण ११२ लाख टन साखर निर्यात केली आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा ७५ लाख टनांचा आहे. साखर धंद्याला सोन्याचे दिवस आले आहेत. शेतकऱ्यांनाही पैसा मिळत आहे. आता शनिवारपर्यंत (दि. १७) आपण शेतकऱ्यांच्या खात्यात ४२ हजार ६०० कोटी रुपये दिले आहेत. जागतिक स्तरावर महाराष्ट्र आता निर्यातीत देशात अव्वल ठरला आहे. युरोप, आशियाला निर्यात करण्याचे दरवाजे आपल्यासाठी उघडली आहेत.

इथेनाॅल निर्मितीवर देखील आपला भर आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यात पुढे आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक होत आहे. तसेच साखर कारखान्यातून पोटॅश निर्मितीही केली जात आहे. साखर कारखाने इंधनाचे कारखाने म्हणून पुढे येऊ लागली आहेत. जगातले साखरेतील आयएसओचे केंद्र महाराष्ट्रात यावे यासाठी आता पुढाकार घ्यायला हवा, असे गायकवाड यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र