शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

T20 world cup 2021: पुण्यातील मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये होणार 'भारत - पाकिस्तान' सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 08:00 IST

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान’चा पहिला सामना रविवारी होणार असल्याने प्रेक्षकांना हा सामना मोठ्या पडद्यावर पाहाण्याची सोय चित्रपटगृह चालकांनी उपलब्ध करून दिली आहे.

ठळक मुद्देचारशे ते हजार रूपयांपर्यतचे तिकिट ठेवण्यात आले आहे

पुणे : रविवार २२ तारखेपासून चित्रपटगृहे खुली होणार आहेत. मात्र, एक-दोन अपवाद सोडले तर गर्दी खेचू शकतील असे चित्रपट प्रदर्शित होत नसले तरी शहरातील मल्टिप्लेक्स रविवारी हाउस फुल होणार आहेत. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान’चा पहिला सामना रविवारी २४ ऑक्टोबरला होणार असल्याने प्रेक्षकांना हा सामना मोठ्या पडद्यावर पाहाण्याची सोय चित्रपटगृह चालकांनी उपलब्ध करून दिली आहे. विविध ठिकाणच्या मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये हा सामना दाखविण्यात येणार असून, त्यासाठी चारशे ते हजार रूपयांपर्यतचे तिकिट ठेवण्यात आले आहे.

गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे चित्रपटगृह बंदच ठेवण्यात आल्यामुळे चित्रपटगृहात जाऊन सहकुटुंब किंवा मित्रमैत्रिणींसमवेत चित्रपट पाहाण्याच्या आनंदाला प्रेक्षकवर्ग मुकला होता. परंतु आता शुक्रवारीच चित्रपटगृहांचा पडदा उघडणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या निर्माते किती प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये येतील याचा अंदाज घेऊनच नवीन चित्रपट प्रदर्शित करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यामुळे चित्रपटगृह खुली झाली तरी नवीन चित्रपट पाहाण्यासाठी प्रेक्षकांना अजून थोडी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. मात्र, पहिल्या आठवडा रिकामा जाऊ नये यासाठी चित्रपटगृह चालकांनी एक अनोखी क्ल्युप्ती लढवली आहे. 

रविवारी  होणा-या  टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध रंगणार आहे. पारपंरिक प्रतिस्पर्धी संघातील हा थरार पाहण्याची संधी चित्रपटगृहांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी तिकिटाचा दरही चारशे ते हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आला आहे. आता ही क्लुप्ती यशस्वी होतीये का? प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतोय हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतT20 Cricketटी-20 क्रिकेटWorld Cup Twenty20विश्वचषक ट्वेन्टी-२०cinemaसिनेमा