इंदापूर तालुक्याला मिळणार चार आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 01:33 PM2020-01-25T13:33:14+5:302020-01-25T13:37:41+5:30

उन्हाळी आवर्तन बैठकीनंतर निर्णय होणार

Indapur taluka will get four revisions of water | इंदापूर तालुक्याला मिळणार चार आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

इंदापूर तालुक्याला मिळणार चार आवर्तने; कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Next
ठळक मुद्दे१ फेब्रुवारीपासून ३० दिवसांचे आवर्तन देणारमागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळ्यात केवळ एकच आवर्तन

पुणे : शेटफळ मध्यम प्रकल्पातून इंदापूर तालुक्यातील काही गावांना रब्बीसाठी एक आणि उन्हाळी तीन अशी चार आवर्तने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एक फेब्रुवारीपासून आवर्तन सोडण्यात येणार आहे. 
रब्बी आणि उन्हाळी हंगामाच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी शेटफळ मध्यम प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर, समितीचे सदस्य सचिव विजय यादव, नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, भोंडणी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शिवाजी हंगे, आरेखक पांडुरंग कटक या वेळी उपस्थित होते.
शेटफळ मध्यम प्रकल्पाची क्षमती ६२० दशलक्ष घनफूट आहे. या प्रकल्पाअंतर्गत १९२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आहे. शेटफळ, भोंडणी, बावडा, नीर-निमगाव, सराटी, लुमेवाडी, गोंडी, पिंपळी, ओझर या गावासह नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, नऊ पाणी वापर संस्थांसह सुमारे ६३ नवीन आणि जुन्या ठिंबक सिंचन योजना या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येतात. मागील वर्षी दुष्काळी स्थितीमुळे उन्हाळ्यात केवळ एकच आवर्तन दिले होते. 
मागील वर्षी नीरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रात अवर्षणजन्य स्थिती होती. त्यामुळे खरीप हंगामात शेटफळ तलाव भरता आला नाही. त्यामुळे रब्बी हंगामात देखील कमी पाणी राहिले होते. शेटफळ तलावातील पाण्याची स्थिती लक्षात घेऊन पाण्याचा काटकसरीने वापरा करावा, उपलब्ध पाणी साठ्यानुसार हंगामनिहाय पीक रचना, पीक कार्यक्रम निश्चित करण्यात यावे, लाभक्षेत्रात बारमाही पिकांसाठी सिंचन व तुषार योजना कृषी विभागामार्फत राबविण्यात याव्या, पाण्याची गळती थांबवावी, वितरिकांची दुरुस्ती करावी, अशा सूचना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. 
.........
उन्हाळी आवर्तन बैठकीनंतर निर्णय होणार
सिंचन आवर्तनाचा कालवधी ३० दिवसांचा असणार आहे. वितरिकांमधून ५० क्युसेकने पाणी सोडण्यात येईल. उन्हाळी हंगामासाठी तीन आवर्तने देण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी रब्बीचे आवर्तन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावण्यात येईल. त्यात उन्हाळी आवर्तनाचा अंतिम निर्णय होईल. 

Web Title: Indapur taluka will get four revisions of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.