Indapur Municipal Council Election Result 2025: इंदापूर नगरपरिषद अजित पवारांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:29 IST2025-12-21T12:28:04+5:302025-12-21T12:29:18+5:30
पुणे जिल्हा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा यांचा 120 मतांनी विजयी झाले

Indapur Municipal Council Election Result 2025: इंदापूर नगरपरिषद अजित पवारांच्या ताब्यात
इंदापूर :पुणे जिल्हा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार भरत शहा यांचा 120 मतांनी विजयी झाले आहे. इंदापूर नगरपरिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्याचे चित्र समोर आले आहे. तर प्रदीप गारटकर पराभूत झाल्या आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील, भाजपचे प्रवीण माने आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप गारटकर यांना मोठा धक्का बसला आहे. इंदापूर नगरपरिषद निवडणुकीत ( दि. २) डिसेंबरला सुमारे ७८ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले होते.
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप या पक्षांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये नगराध्यक्ष पदासाठी सर्वाधक पसंती मिळालेले माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षात प्रवेश द्यावा, मात्र उमेदवारी देवू नये, पक्षाच्या जुन्या निष्ठावंतास नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी यासाठी अडून बसल्यानंतर देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बधत नाही असे दिसल्यानंतर, पदाचा राजीनामा देण्याची तयारी ठेवून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान देत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी उभा दावा करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून पुढे आले.
त्यांना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाने पाठींबा देण्यासाठी कृष्णा भीमा विकास आघाडी पॅनल उभा केले. त्यांचे राजकीय हाडवैरी हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांच्या विरोधात नगराध्यक्षपदाचे दावेदार असणारे भरत शहा व त्यांच्या पाठीशी असणारे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल यामध्ये सरळ लढत होणार आहे. प्रचाराला मिळालेल्या मोजक्या दिवसात दोन्ही बाजूंनी प्रचाराचा धडाका लावला होता. सरशी कोणाची होणार याकडे पुणे जिल्हा व राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिले आहे.