Video : चोरांना बघून चक्क पोलिसांनीच ठोकली धूम; घटना सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 04:10 PM2020-12-29T16:10:48+5:302020-12-29T19:25:08+5:30

Pune Police: विशेष म्हणजे चोरांच्या हातातील हत्यार बघून दुचाकी चालवणारा पोलीस आपल्या साथीदार पोलिसालाही तिथेच सोडून पळाला.

Incredible! Thieves came in front, police run away; incident captured in the cctv | Video : चोरांना बघून चक्क पोलिसांनीच ठोकली धूम; घटना सीसीटीव्हीत कैद

Video : चोरांना बघून चक्क पोलिसांनीच ठोकली धूम; घटना सीसीटीव्हीत कैद

googlenewsNext

पुणे : सामान्य नागरिकांचा सर्वाधिक विश्वास ज्याच्यावर असतो तेच पोलीस चोर बघून पळून गेल्याची घटना पुण्यात घडली आहे. पोलिसांना बघून चोराने पळून जाणं काहीस सामान्य असताना पुण्यात मात्र चक्क चोर बघून पोलिसच पळून गेल्याची घटना घडलेली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून त्यात चोरांना बघून धूम ठोकणारे पोलीस कर्मचारी कैद झाले आहेत. 

पुण्यातल्या औंध भागामध्ये सिद्धार्थ नगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये ही घटना घडली. सोसायटीमध्ये काल रात्री तीनच्या सुमारास चोर शिरले. त्यांनी बंद केलेल्या चार फ्लॅटचे कुलूप तोडले आणि पाचव्या फ्लॅटमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न सुरू असताना नागरिकांनी तातडीने पोलिसांना फोन करून घटनास्थळी येण्याची विनंती केली. यावेळी काही मिनिटात पोलीस सोसायटी बाहेर दाखल झाले. मात्र समोरून चोर आल्याचे बघून पोलीसच पळून गेले आहेत.

 

विशेष म्हणजे चोरांच्या हातातील हत्यार बघून दुचाकी चालवणारा पोलीस आपल्या साथीदार पोलिसालाही तिथेच सोडून पळाला आहे. पोलिसांची ही हालचाल सीसीटीव्हीमध्ये कैद झाली दुसरीकडे चोरांनाही सोसायटीत राहणाऱ्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आल्याने त्यांनी पळ काढला. मात्र चोरांच्या आधी ज्या प्रवेशद्वारातून पोलीस निघून गेले किंवा पळाली. त्यात प्रवेशद्वारातून यांच्या नंतर कळाले त्यामुळे पकडण्याची संधी असूनही पोलिसांनी घटनेकडे दुर्लक्ष केले की अजुन काही कारण होते हे समजले नाही. 

दरम्यान, यातले चार फ्लॅट बंद असल्याने मोठा ऐवज चोरीला गेला नाही. पण एका फ्लॅटमधील एलईडी टीव्ही नेण्यास चोर यशस्वी झाले. संकटाच्यावेळी तारणहार असलेले पोलीस जर पळून जात असतील तर नागरिकांनी कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता स्थानिक विचारत आहेत.या घटनेची दखल आता चतुःशृंगी पोलिसांनी घेतली असून संबंधित पोलिसांचा अहवाल आयुक्तांकडे पाठवण्यात आला आहे. 

Web Title: Incredible! Thieves came in front, police run away; incident captured in the cctv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.