शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

सोशल मीडियामुळे जनजागृतीत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 23:00 IST

सोशल माध्यमे हे दुधारी शस्त्र...

ठळक मुद्देगुन्हेगाराचा शोध घेण्याकरिता असलेल्या साधनसामुग्रीचा तुटवडा याने प्रश्न आणखी गंभीर

अ‍ॅड. सुप्रिया कोठारी - सोशल माध्यमांचा वाढता वापर यामुळे महिला अत्याचारात वाढ होते आहे असे म्हणणे चुकीचे ठरेल. याचे कारण म्हणजे आपण त्या माध्यमाचा कशापद्धतीने वापर करतो हे आहे. याउलट फेसबूक, व्हाट्सअप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात जनजागृती वाढत आहे असे आवर्जून सांगावेसे वाटते.आजकाल सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर पोस्ट केल्या जात आहेत. याचा परिणाम संबंधित व्यक्ती तिच्या संपकार्तील इतर व्यक्ती एकूणच तिच्या व्यक्तिमत्त्वावर होत असल्याचे दिसून येते. पूर्वी आपल्या ओळखीची चार दोन माणसे त्यांच्याबरोबरचा रोजचा होणारा संवाद एवढी काय ती आपली सोशल होण्याची मर्यादा होती. आता त्याचा परीघ बराचसा विस्तारला आहे. मागील काही दिवसांपूर्वी चर्चेत असणाऱ्या  ‘मी टू’ च्या चळवळीला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद खुप काही सांगणारा होता. सोशल माध्यमे हे दुधारी शस्त्र असून त्याची परिणामकारकता वापरकर्त्यावर अवलंबून आहे. हे प्रामुख्याने लक्षात घेण्याची गरज आहे. अमुक एखादी व्यक्ती ज्यावेळी फेसबुकवर दुसऱ्या अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येते तेव्हा तिने सावध भूमिका घेणे गरजेचे आहे. आपण त्या व्यक्तीशी काय बोलतो, तिला कुठली माहिती सांगतो इतकेच नव्हे तर आपले जी वैयक्तिक गोष्ट आहे त्याबद्दल सांगतो तेव्हा ते आपल्याकरिता धोकादायक ठरणार असते. हे आपल्याला त्यावेळी समजत नाही. दुसरी महत्वाची बाब म्हणजे आपल्या पोलीस प्रशासनाला सायबर गुन्हयांविषयी असलेली अपुरी माहिती हे आहे. सर्वसामान्य महिलेला ज्यावेळी आपली फेसबुक अथवा व्हाटसअपच्या माध्यमातून बदनामी, फसवणूक झाली आहे असे समजते तेव्हा काय करावे, कुणाकडे तक्रार द्यावी याविषयी तिला कुठल्याही स्वरुपाची माहिती नसते. अशावेळी ती पोलीसांकडून सहकार्य मिळेल अशा अपेक्षेत असताना प्रत्यक्षात पोलीसांक डे असलेली अपुरी माहिती, गुन्हेगाराचा शोध घेण्याकरिता असलेल्या साधनसामुग्रीचा तुटवडा याने प्रश्न आणखी गंभीर होतो.  मुळातच स्वत:ला जास्तीत जास्त प्रकाशझोतात आणण्याच्या निमित्ताने आपण कशापध्दतीने या माध्यमांवर व्यक्त होतो हे सर्वांनी तपासून पाहणे गरजेचे आहे. हे सुचवावेसे वाटते. आभासी दुनियेत किती काळ रमायचे? त्याला कितपत महत्व द्यायचे? या सर्व गोष्टी आपल्याच हातात आहेत........

प्रगती पाटील, अ‍ॅडव्होकेट आणि सामाजिक कार्यकर्त्या महिलांवरील अत्याचारांसाठी सोशल मीडियाला जबाबदार धरू शकत नाही. तेलंगणा किंवा निर्भया प्रकरणातील बलात्काराच्या घटना पाहिल्या तर आरोपी हे सुशिक्षित नाहीत असे दिसते. त्यांची पार्श्वभूमी चांगली नाही. त्यांच्या मनात विकृती आहे. त्यांच्यात संस्कृतपणा नाही. या घटनांसाठी सोशल मीडिया नव्हे तर ती व्यक्ती जबाबदार असते. सोशल मीडियाला काही अंशी यासाठी जबाबदार धरता येईल की महिला त्यांचे फोटो मीडियावर अपलोड करताना काळजी घेत नाहीत. त्याचा गैरवापर होऊ शकतो हेच त्यांना कळत नाही. इंटरनेटचा वापर चुकीच्या पद्धतीने होता कामा नये. पण दुसऱ्या बाजूला विचार केला तर सोशल मीडियामुळे एखाद्या घटनेबददल दबाव गटही निर्माण होऊ शकतो. सोशल मीडियाचा शस्त्र म्हणूनही विधायक कामासाठी वापर होऊ शकतो. एखादा चांगला संदेश दोन मिनिटात सर्वत्र पोहोचू शकतो. हे देखील लक्षात घेतले पाहिजे..       

 

टॅग्स :PuneपुणेadvocateवकिलSocial Mediaसोशल मीडिया