शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

ससूनमधील मृतांच्या वाढत्या संख्येमागे संबंधित रुग्णांचे 'इतर आजार व उपचार विलंब' हेच कारण   

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 13:49 IST

ससून रुग्णालयामध्ये मृत्युचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणास्तव अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देपदभार सोडल्यानंतर लगेच मृत्यु झालेल्या रुग्णांची माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर आजार पडल्यानंतर ससूनमध्ये दाखल होण्याचा कालावधी एक ते आठ दिवसांपर्यंतचा एकुण मृतांपैकी केवळ दोन जणांना कोणताही आजार नसला तरी त्यांचे वय ५५ हून अधिक बहुतेक रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा त्यापैकी एक व अन्य आजार आढळून

राजानंद मोरे-  

पुणे : ससून रुग्णालयातील मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असला तरी हे मृत्यू संबंधित रुग्णांना इतर आजार असल्याने किंवा उपचारासाठी विलंब झाल्यानेच ओढावले असल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पहिल्या तीन दिवसांतच सुमारे २० जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा त्यापैकी एक व अन्य आजार आढळून आला आहे. एकुण मृतांपैकी केवळ दोन जणांना कोणताही आजार नसला तरी त्यांचे वय ५५ हून अधिक होते. तसेच मृतांमध्ये १७ जणांचे वय ६० वर्षांहून अधिक होते.ससून रुग्णालयामध्ये मृत्युचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणास्तव अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. पण त्यांनीही यापुर्वी हे मृत्यू विविध आजार असलेले, ज्येष्ठ तसेच विलंबाने उपचार मिळाल्याने झाल्याचे सांगितले होते. आता रुग्णालय प्रशासनाने चंदनवाले यांची पदभार सोडल्यानंतर लगेच मृत्यु झालेल्या रुग्णांचे विश्लेषण करून ही माहिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. अधिष्ठाता डॉ. श्रीनिवास शिंत्रे यांनी हे पत्रक काढून मृत्यूची कारणमीमांसा केली आहे. ससूनमध्ये शुक्रवारीपर्यंत एकुण ४० मृत्यू झाले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी २१ रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब, २० जणांमध्ये मधुमेह, ५ जण लठ्ठ, तिघांना अस्थमा, दोघांनी मुत्रपिंड तर उर्वरीत रुग्णांना इतर कोणता ना कोणता आजार होता. केवळ दोन रुग्णांना कोणताही आजार नव्हता. तसेच रुग्ण आजारी पडल्यानंतर लगेच रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही रुग्णालयाने काढले आहे.आजार पडल्यानंतर ससूनमध्ये दाखल होण्याचा कालावधी एक ते आठ दिवसांपर्यंतचा आहे. एकुण मृतांपैकी ११ जणांना आजारी पडल्यानंतर सहा दिवसांनी रुग्णालयात आणण्यात आले होते. तर १० जण चौथ्या व पाचव्या दिवशी आले. आजार बळावल्यानंतर तिसऱ्या दिवशी येणाऱ्या रुग्णांची संख्या ११ होती. तर सुरूवातीच्या दोन दिवसांत आलेल्या रुग्ण केवळ सात होते. एकुण मृतांपैकी सात जणांना अन्य रुग्णालयातून ससूनमध्ये पाठविण्यात आले होते. तर उर्वरीत रुग्ण ओपीडीतून दाखल झाले होते.------------------------वयही महत्वाचा घटकससून रुग्णालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे ह्यलोकमतह्णने केलेल्या विश्लेषणानुसार, मृतांमध्ये वय हा मुद्दाही महत्वाचा ठरत आहेत. मृतांमध्ये ६० वर्षांहून अधिक वय असलेले १७ जण आहेत. तर ५० ते ५९ वय असलेले १३, ४० ते ४९ वय असलेले ८ आणि उर्वरीत दोघे २७ व ३० वर्षे वयाचे आहेत. जगभरातील मृतांमध्ये वयोवृध्दांची संख्या जास्त असल्याचे आढळून आले आहे.----------रुग्णालयात दाखल झालेल्या दिवशी मृत्यू पावणाऱ्यांची संख्या सहा आहे. याचा अर्थ हे रुग्ण अत्यवस्थ असताना रुग्णालयात दाखल झाले होते. दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या दिवशी मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या प्रत्येकी सात म्हणजे एकुण २१ एवढी आहे. २० हून अधिक केसमध्ये रुग्णालय प्रशासनाला उपचारांसाठी ४८ तासही मिळाले नाहीत. दहा रुग्णांचा मृत्यू पाच दिवसांनी झाला आहे.------------मृत्यू झालेल्या रुग्णांमधील अन्य आजार -उच्च रक्तदाब - २१मधुमेह - २०लठ्ठपणा - ५अस्थमा - ३मुत्रपिंड - २अन्य - ४--------------आजारी पडल्यानंतर दाखल होण्याचा कालावधी -कालावधी                            रुग्ण टक्केवारीत्याच दिवशी   ५                       १२.८२एक                 २                       ५.१३दोन                ११                      २८.२१तीन                ४                       १०.२६चार                ६                        १५.३८पाच               ५                         १२.८२सहा               ४                        १०.२६सात               १                        २.५६आठ               १                        २.५६------------------------------अन्य रुग्णालयातून पाठविलेले -एकुण - ३९अन्य रुग्णालयातून - ७थेट आलेले - ३२-----------------रुग्णालयात दाखल व मृत्यूचा कालावधीदाखल झालेल्या दिवशी मृत्यू - ६दुसऱ्या दिवशी - ७तिसऱ्या दिवशी - ७चौथ्या दिवशी - ७पाचव्या दिवशी - ५सहाव्या दिवशी - २सातव्या दिवशी - ३-----------------

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलDeathमृत्यूCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर