शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

Income Tax Raid : नेचर उद्योगसमूहावर आयकर विभागाचा छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 15:15 IST

देसाई हे जरी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जात असले, तरी सध्या शरद पवार गटाशी त्यांची जवळीकता वाढल्याचे तालुक्यात चर्चा

सतीश सांगळे/ पोपटराव मुळीककळस/लासुर्णे : इंदापुर तालुक्यातील कळस येथील उद्योजक अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट उद्योगसमूहावर आयकर विभागाने बुधवारी सकाळी छापा मारला. त्याचबरोबर देसाई यांचे जावई जय हिंद कॅटल फीडचे व्यवस्थापकीय संचालक मयूर कांतीलाल जामदार यांच्या निवासस्थानावरही आयकर विभागाचे पथक पोहोचले आहे. या छापेमारीमुळे इंदापूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अर्जुन देसाई हे मोठे उद्योजक असून, बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. नेचर डिलाइट उद्योगसमूहाबरोबर देसाई इन्फ्रा नावाची कंपनीदेखील आहे. देसाई उद्योगसमूहाचे दुग्ध प्रकल्प, पशुखाद्य उत्पादन, पाणी प्रकल्प या ठिकाणी कार्यरत आहे. सुमारे २० लाख लिटर दैनंदिन क्षमता असलेला मोठा दूध प्रकल्प या ठिकाणी गेली आठ वर्षे कार्यरत आहे. राज्याच्या विविध भागांतून या ठिकाणी दूध आणले जाते. या माध्यमातून दूध पॅकिंग करून ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येते. तसेच, बटर, लोणी, दूध पावडर, तूप यांचे उत्पादन घेऊन वितरण केले जाते. तसेच, पाणी प्रकल्प व पशुखाद्य उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. बुधवारी सकाळी ६ वाजता आयकर विभागाचे २५ अधिकारी आठ वाहनांच्या ताफ्यासह नेचर उद्योगसमूहात दाखल झाले. त्यानंतर त्यातील एका पथकाने देसाई यांच्या घरातही तळ ठोकला आहे.

दुसरीकडे देसाई यांचे जावई जय हिंद कॅटल फीडचे व्यवस्थापकीय संचालक मयूर कांतीलाल जामदार यांच्या बेलवाडी येथील पवार मळा या निवासस्थानी पहाटे आयकर विभागाने छापा टाकला. दुपारी दोन वाजेपर्यंत अधिकारी जामदार यांच्या निवासस्थानी तपासणीसाठी बसून आहेत, तर देसाई यांचे कदमवाडी (ता. माळशिरस जि.सोलापूर) येथील नातेवाईक संतोष कदम यांच्या देखील निवासस्थानी आयकर विभागाचे अधिकारी दाखल झाल्याची चर्चा आहे. आयकरच्या या छापेमारीमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.आयकर छाप्याला राजकीय किनार

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्योजक अर्जुन देसाई यांनी शरद पवार गटाला सहकार्य केल्याची चर्चा आहे. देसाई हे जरी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जात असले, तरी सध्या शरद पवार गटाशी त्यांची जवळीकता वाढल्याचे तालुक्यात चर्चा आहे. दरम्यान सातारा जिल्ह्यातील फलटण येथील विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावही आयकर विभागाने छापा मारला आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे ही छापेमारी राजकीय हेतूनेच केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडIncome Taxइन्कम टॅक्सIncome Tax Officeमुख्य आयकर आयुक्त कार्यालयAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार