शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

सिरमच्या न्यूमोकॉकल लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:16 IST

लहान मुलांमध्ये न्यूमोकॉकस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नवजात अर्भके मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. न्यूमोकॉकल लस भारतीयांना ...

लहान मुलांमध्ये न्यूमोकॉकस या विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण मोठे आहे. यामुळे नवजात अर्भके मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. न्यूमोकॉकल लस भारतीयांना कमी किमतीत उपलब्ध व्हावी, यासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घेतला. ‘न्यूमोसील’ ही स्वदेशी लसीचे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत डिसेंबर २०२० मध्ये औपचारिक उद्घाटन करण्यात आले होते. सिरमने डिसेंबर या लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश केल्याच्या निर्णयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी स्वागत केले आहे. पूनावाला यांनी व्टिटमध्ये म्हटले आहे की, ‘आरोग्य क्षेत्र आणि लसीकरणातील गुंतवणूक ही कोणत्याही देशासाठी सर्वोत्तम गुंतवणूक ठरते. केंद्रीय अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याबद्दल निर्मला सीतारामन यांचे आभार मानतो. स्वस्थ भारत हाच कार्यक्षम भारत ठरू शकतो.’

देशातील ७० टक्के नागरिकांमध्ये सुप्तावस्थेतील लक्षणे दिसतात. जागतिक स्तरावरही पाच वर्षांखालील सर्वाधिक बालकांच्या मृत्यूचे कारण न्यूमोनिया हे आहे. त्यापैकी २० टक्के लहान मुले भारतीय आहेत. आतापर्यंत लस आयात केली जात असल्याने सर्व बालकांना देणे शक्य होत नव्हते. न्यूमोकॉकल लसीची बाजारातील किंमत ४५०० रुपये आहे. राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात समावेश केल्याने ही लस मोफत किंवा कमी किमतीत मिळू शकणार आहे. ५५ वर्षावरील व्यक्तींसाठीही ही लस फायदेशीर ठरणार आहे.