शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

पुस्तकांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करा; प्रकाशकांची शासनाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 7:48 PM

लॉकडाऊनच्या काळात सध्या सर्वच लोक घरी आहेत. वेळेचा सदुपयोग व्हावा, सकारात्मक विचार पेरले जावेत यादृष्टीने पुस्तकांसारखा उत्तम मार्ग नाही.

ठळक मुद्देमराठी प्रकाशक संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्रही ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याचे संकेत

पुणे : पुणे, मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ३ मेनंतरही लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळू लागले आहेत. प्रकाशन व्यवसायाचा अत्यावश्यक सेवांच्या यादीत समावेश करावा आणि पुस्तकांची दुकाने खुली करण्यास आणि पुस्तके घरपोच देण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी प्रकाशकांकडून शासनाकडे करण्यात आली आहे. मराठी प्रकाशक संघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्रही पाठवण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात सध्या सर्वच लोक घरी आहेत. वेळेचा सदुपयोग व्हावा, सकारात्मक विचार पेरले जावेत यादृष्टीने पुस्तकांसारखा उत्तम मार्ग नाही. पुस्तकांमध्ये ललित साहित्याबरोबरच शैक्षणिक, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, व्यक्तिमत्व विकास अशा अनेक प्रकारचे साहित्य उपलब्ध असते. साहित्य समाजाचे मानसिक आरोग्य संतुलित राखण्यास मदत करते. सध्याच्या परिस्थितीत प्रत्यक्ष अथवा इबुक, आॅडिओ बुक अशा कोणत्याही रुपात पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यामुळे पुस्तकांचा अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करून, त्यांची घरपोच सुविधा निर्माण करण्यास परवानगी द्यावी, असे  मत प्रकाशकांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

अनिल कुलकर्णी यांनी याबाबत वेगळे विचार मांडले. ते म्हणाले, 'रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुस्तक हा आवश्यक घटक असला तरी सध्याची परिस्थिती पाहता सुरक्षेच्या नियमांचे पालन ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रकाशकांनीही शासनाला सहकार्य करावे.'

----पुस्तके खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुशिक्षित वर्ग येतो. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग पाळून पुस्तक खरेदी होऊ शकते. सकारात्मक विचारांसाठी, विचारांना योग्य दिशा करण्यासाठी पुस्तके खूप महत्वाची आहेत. रेड झोनचा विचार करून पुस्तकांची दुकाने सुरू करण्याची परवानगी देणे शक्य नसल्यास किमान कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून पुस्तके घरपोच देण्यास परवानगी द्यावी. सुरक्षेचे सर्व नियम पाळून किमान कर्मचा?्यांमध्ये काम सुरू करता येईल.- रोहन चंपानेरकर, रोहन प्रकाशन---- 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस