मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 00:02 IST2024-09-26T23:59:40+5:302024-09-27T00:02:43+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित गुरूवारचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे.

Inauguration of metro subway will be done online by Narendra Modi!  | मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित

मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित

पुणे : जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज होणार होते. मात्र पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला आहे. आता या भुयारी मार्गाचे लोकार्पण 29 सप्टेंबर रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित गुरूवारचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गाचे लोकार्पण कधी होणार याबद्दल उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांचे उद्घाटन 29 सप्टेंबर रोजी ऑनलाईन होणार आहे. 

त्यामध्ये जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या भूमीगत मार्गाचे उद्घाटन आणि स्वारगेट - कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमीपूजन केले जाणार आहे. तसेच क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा, या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. सोलापुर विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे.

Web Title: Inauguration of metro subway will be done online by Narendra Modi! 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.