उत्तम जाधव यांच्या हत्या प्रकरणी १२ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 00:20 IST2025-08-14T00:20:00+5:302025-08-14T00:20:25+5:30

इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील उत्तम जालिंधर जाधव यांच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणात, वालचंदनगर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे.

In the murder case of Uttam Jadhav | उत्तम जाधव यांच्या हत्या प्रकरणी १२ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

उत्तम जाधव यांच्या हत्या प्रकरणी १२ जणांवर मोक्का अंतर्गत कारवाई

वालचंद नगर /कळस 

इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथील उत्तम जालिंधर जाधव यांच्या निर्घृण खुनाच्या प्रकरणात, वालचंदनगर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. वर्चस्वाच्या वादातून झालेल्या या खुनातील मुख्य आरोपी राजेंद्र उर्फ राजू भाळे आणि त्याच्या टोळीतील १२ सदस्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

२७ फेब्रुवारी २०२५ रोजी उत्तम जाधव हे त्यांच्या जेसीबी चालकाला जेवणाचा डबा देण्यासाठी जात असताना राजू भाळे, नाना भाळे, तुकाराम खरात, निरंजन पवार, रामा भाळे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी त्यांना अडवले. 'आमच्या दुश्मनांना मदत करतोस, आमच्या भांडणात मध्यस्थी करतोस' असे म्हणत त्यांनी उत्तम जाधव यांच्यावर कोयते, तलवारी आणि दगडांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले उत्तम जाधव यांचा उपचारादरम्यान अकलूज येथील रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेनंतर वालचंदनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तपास पथकांनी आरोपींचा शोध सुरू केला आणि राजू भाळे याच्यासह एकूण १३ आरोपींना अटक केली.

तपासादरम्यान, राजू भाळे आणि त्याच्या टोळीची गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आली. टोळीप्रमुख राजू भाळे याच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत. तसेच, इतर सदस्यांवरही विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी धनाजी मसुगडे आणि निरंजन पवार यांच्यावर यापूर्वीही दोन वेळा मोक्का अंतर्गत कारवाई झालेली आहे.राजेंद्र ऊर्फ राजू महादेव भाळे, (रा. खोरोची, ता. इंदापूर), रामदास ऊर्फ रामा शिवाजी भाळे,( रा. खोरोची, ता. इंदापूर),शुभम ऊर्फ दादा बापू आटोळे, (रा. शेळगाव, ता. इंदापूर), स्वप्नील बबन वाघमोडे,( रा. रेडणी, ता. इंदापूर), नाना भागवत भाळे, (रा. खोरोची, ता. इंदापूर ),निरंजन लहू पवार, (रा. खोरोची, ता. इंदापूर ), तुकाराम ज्ञानदेव खरात,( रा. खोरोची, ता. इंदापूर), मयूर ऊर्फ जिजा मोहन पाटोळे, (रा. निमसाखर, ता. इंदापूर), अशोक बाळू यादव, सध्या (रा. शेळगाव, ता. इंदापूर),धनाजी गोविंद मसुगडे, (रा. कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर), सोमनाथ बबन पवार, (रा. कळंब, ता. इंदापूर)सनी विलास हरिहर,( रा. अंथुर्णे शेळगाव, ता. इंदापूर), अक्षय भरत शिंगाडे, (रा. शेळगाव, ता. इंदापूर), राजेंद्र ऊर्फ राजू महादेव भाळे यांच्यावर १२ गुन्हे दाखल आहेत.रामदास भाळे, स्वप्नील वाघमोडे, मयूर ऊर्फ जिजा पाटोळे, अशोक यादव आणि सनी हरिहर याच्यावर प्रत्येकी २ गुन्हे दाखल आहेत.तुकाराम खरात, धनाजी मसुगडे आणि नाना भाळे यांच्यावर प्रत्येकी ३ गुन्हे दाखल आहेत.निरंजन पवार याच्यावर ५ गुन्हे दाखल आहेत.

राजू भाळे आणि त्याच्या टोळीने इंदापूर, माळशिरस, नातेपुते या भागांमध्ये वर्चस्व वाढवण्यासाठी आणि आर्थिक फायदा मिळवण्यासाठी संघटितपणे अनेक गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे आवश्यक असल्याने, वालचंदनगर पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे सादर केला. या प्रस्तावाला पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली. आता या प्रकरणाचा पुढील तपास बारामती विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड करत आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वालचंदनगर पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली आहे. या कठोर कारवाईमुळे संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचे दिसून येत आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, संदीपसिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक, गणेश बिरादार, बारामती उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. सुदर्शन राठोड आणि पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

वालचंदनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलीस उपनिरीक्षक मिलींद मिठापल्ली, स्थानिक गुन्हे शाखेचे महेश बनकर आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी अभिजीत कळसकर, शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील, जगदीश चौधर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर तसेच कोर्ट अंमलदार प्रेमा सोनावणे आणि सचिन खुळे यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पूर्ण केली.

Web Title: In the murder case of Uttam Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.