Pune Crime: सराफी पेढीत कामगारानेच मारला साडेनऊ लाखांच्या सोन्यावर डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2024 19:11 IST2024-04-01T19:11:01+5:302024-04-01T19:11:21+5:30

पुणे : सराफी पेढीतील कामगाराने साडेनऊ लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना रविवार पेठेतील सराफ बाजारात घडली. या प्रकरणी ...

In Sarafi Pedhi, a worker killed a gold bullion worth nine and a half lakhs | Pune Crime: सराफी पेढीत कामगारानेच मारला साडेनऊ लाखांच्या सोन्यावर डल्ला

Pune Crime: सराफी पेढीत कामगारानेच मारला साडेनऊ लाखांच्या सोन्यावर डल्ला

पुणे : सराफी पेढीतील कामगाराने साडेनऊ लाख रुपयांचे सोने चोरून नेल्याची घटना रविवार पेठेतील सराफ बाजारात घडली. या प्रकरणी रिजाबूल शहा ऊर्फ साफिक शेख (२८, रा. वर्धमान, पश्चिम बंगाल) याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत साबीर सुकुर मलिक (३६, रा. नाना पेठ) यांनी फरासखाना पोलिसांत फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, साबीर शेख यांचा दागिने घडविण्याचा व्यवसाय आहे. आरोपी रिजाबूल शहा त्यांच्याकडे कामाला होता. शहाने मलिक यांचे लक्ष नसल्याची संधी साधून नऊ लाख ५९ हजार रुपयांचे सोने चोरून नेले. सोन्याची लगड चोरून शहा पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर मलिक यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Web Title: In Sarafi Pedhi, a worker killed a gold bullion worth nine and a half lakhs