शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पुण्यात 'पोलिसांचा धाक' नावाची गोष्ट आता काहीच उरलेली नाही; अंधारेंचा स्वारगेट घटनेवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:02 IST

पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे

पुणे: स्वारगेट शिवशाही प्रकरणाने शहरात संतापजनक वातावरण तयार झाले आहे. या बलात्काराच्या घटनेने मुली, तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राजकीय वर्तुळातूनही पुण्याच्या सुरक्षेवर ताशेरे ओढले जात आहेत. अशातच उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. पुण्यात पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.   

अंधारे म्हणाल्या, स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे. पुण्यामध्ये  गेली अनेक वर्ष मी वावरतेय. पंधरा वर्षांपूर्वीच पुणे आणि आत्ताचं पुणे यात प्रचंड फरक जाणवत आहे. दहा बारा वर्षापूर्वी जर पुण्याच्या शिवाजीनगर बस स्टॅन्डवर आम्ही उतरलो आणि रिक्षा करायची ठरवली. रात्री अपरात्री जरी रिक्षा घेतली तर शिवाजीनगर पोलीस चौकीचे पोलीस यायचे आणि रिक्षाचा नंबर नोंदवून घ्यायचे. आपण सुरक्षितपणे घरी पोहचवू ही महिलांना हमी होती. मात्र ते वातावरण हळूहळू बदलत चाललंय. पुण्यातली कायदे सुव्यवस्थेची पकड अत्यंत सैल होत चाललेली आहे. पोलिसांचा धाक नावाची गोष्ट तर आता काही उरलेलीच नाहीये.

वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत. विशेषतः शाळा, कॉलेज, बस स्टॅन्ड आणि रेल्वे स्टेशन इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे. मात्र ते होताना दिसत नाहीये. घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे. 

टॅग्स :PuneपुणेSushma Andhareसुषमा अंधारेswargateस्वारगेटPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीPoliticsराजकारण