पुण्यात ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करून मोबाईल हिसकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 21:20 IST2022-09-05T21:16:33+5:302022-09-05T21:20:02+5:30

पुणे : मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्याला प्रतिकार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार केल्याची घटना खराडी भागात सकाळी घडली. चोरट्यांनी केलेल्या ...

In Pune, a senior citizen was attacked by a coyote and snatched his mobile phone | पुण्यात ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करून मोबाईल हिसकावला

पुण्यात ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार करून मोबाईल हिसकावला

पुणे : मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्याला प्रतिकार करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने वार केल्याची घटना खराडी भागात सकाळी घडली.

चोरट्यांनी केलेल्या या हल्ल्यात बबन कुंडलिक दहिफळे (वय ६०, रा. शांतीनगर, चौधरी वस्ती, खराडी) जखमी झाले आहेत. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, खराडीतील टस्कन सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर सकाळी सहाच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी दहिफळे यांच्याकडील मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखून दहिफळे यांनी दुचाकीवरील मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्याला पकडले. झटापटीत दुचाकीवरील तीन चोरटे रस्त्यावर पडले. त्यानंतर एका चोरट्याने दहिफळे यांच्या पायावर कोयत्याने वार केला. दहिफळे यांच्याकडील १० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून चोरटे पसार झाले.

पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हस्के तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पादचारी नागरिकांकडील मोबाइल हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांनी शहरात उच्छाद मांडला आहे.

Web Title: In Pune, a senior citizen was attacked by a coyote and snatched his mobile phone