Pune | नीरेत २ हजार ४५० विद्यार्थ्यांनी गायले समुह राष्ट्रगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2022 17:25 IST2022-08-17T17:21:38+5:302022-08-17T17:25:02+5:30

नीरा : ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या अंतर्गत बुधवार दि.१७ रोजी सकाळी ...

In Nira 2 thousand 450 students sang the national anthem independence day 2022 | Pune | नीरेत २ हजार ४५० विद्यार्थ्यांनी गायले समुह राष्ट्रगीत

Pune | नीरेत २ हजार ४५० विद्यार्थ्यांनी गायले समुह राष्ट्रगीत

नीरा : ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात स्वराज्य महोत्सवाचे आयोजन केले होते. त्या अंतर्गत बुधवार दि.१७ रोजी सकाळी अकरा वाजता समुह राष्ट्रगीत गायनाच्या सुचना होत्या. नीरा (ता.पुरंदर) येथील रयत शिक्षण संकुलातील चार विद्यालयातील तसेच जिल्हा परिषदेच्या दोन शाळातील तब्बल २ हजार ४५० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी समुह राष्ट्रगीत गायले. 

नीरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं १ मुलांची मधिल २५०, शाळा नं २ मुलींची मधील २६२ विद्यार्थ्यीनींनी असे एकुण ५२५ तर १८ शिक्षकांनी समुह राष्ट्रगीत गायन केले.

सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या शाळा व ज्युनिअर कॉलेज मधील ६५५ विद्यार्थीनी तसेच २५ शिक्षक तर महात्मा गांधी विद्यालय, इंग्लिश मेडियम स्कुल व किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे १,२०० विद्यार्थी तसेच ४० शिक्षकांनी ठीक अकरा वाजता समुह राष्ट्रगीत गायन केले.

Web Title: In Nira 2 thousand 450 students sang the national anthem independence day 2022