शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

मंचरमध्ये दरोडेखोरांनी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लुटला; ५ जणांच्या मुसक्या आवळल्या, दोघे फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 12:16 IST

जैना समदडिया या धाडसी मुलीने हत्यारबंद दरोडेखोरांशी दोन हात केले आहे....

मंचर (पुणे) : शहरातील उत्तम भाग्य ज्वेलर्सवर दरोडा टाकून सात दरोडेखोरांनी साडेसहा लाख रुपयांचा ऐवज चोरला. परत जाताना त्यांनी दुकान मालकाची आई, मुलगा, मुलीला बांधून ठेवून दमदाटी केली. पोलिसांनी व स्थानिकांनी तत्परता दाखवत घटनास्थळी येऊन पाच दरोडेखोरांना जेरबंद केले असून दोघे फरार झाले आहेत. ही थरारक घटना आज पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे. जैना समदडिया या धाडसी मुलीने हत्यारबंद दरोडेखोरांशी दोन हात केले आहे.

मंचर शहराच्या बाजारपेठेत भरवस्तीत उत्तम भाग्य ज्वेलर्स हे सोन्या-चांदीचे दुकान आहे. मागील एक महिन्यापासून या दुकानाची रेकी दरोडेखोरांनी केली होती. त्यांना स्थानिक दोघांनी मदत करत इत्यंभूत माहिती पुरवली. रात्री मालक अभिजीत समदडिया दुसऱ्या मजल्यावर तर त्यांची आई ललिताबाई (वय 75), मुलगा यश (वय 21),मुलगी जैना (वय 16) हे पहिल्या मजल्यावर झोपले होते. आज पहाटे सव्वा दोन वाजता सात दरोडेखोर ड्रेनेजच्या पाईपवरून तीन मजली इमारतीवर चढले. वरील दरवाजा तोडून जिन्याने ते खाली असलेल्या सोने-चांदीच्या दुकानात आले. दुकानाचे सायरन बंद करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे तोंड फिरवण्यात आले.

दुकानातील 18 किलो 710 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच दोन लाख बावीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरट्यांनी लुटला. ऐवज घेऊन परत जाताना एका दरोडेखोराचा धक्का पहिल्या मजल्यावरील दरवाजाला लागला. आत झोपलेला यश याला वडील आले असावेत असे समजून त्याने दरवाजा उघडला. त्यावेळी हातात कोयता, कटावणी घेऊन दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढविला. यश पळत आजीच्या खोलीत गेला. त्यावेळी झोपलेल्या जैनाकडे दरोडेखराने मोर्चा वळविला. जैनाने धाडस दाखवत एका दरडोखराला लाथ मारली. त्यावेळी दुसऱ्याने तिचे तोंड दाबले असता तिने त्याच्या हाताचा चावा घेतला. ललिता समदडिया यांना दमदाटी करत तुमच्या घरात रोख रक्कम आहे. आम्ही महिन्यापासून वॉच ठेवला आहे. लॉकरची चावी द्या अशी मागणी केली.

मात्र ललिताबाई यांनी चावी नसण्याचे सांगितले. दरोडेखोरांनी तिघांना आतील रूममध्ये बांधून ठेवले. तसेच तेथील सोन्याचे दागिने ताब्यात घेतले. या दरम्यान दुसऱ्या मजल्यावर झोपलेल्या अभिजीत समदडिया यांना झटापटीचा आवाज आला. त्यांनी मोबाईलमधील सीसीटीव्ही कॅमेरे चालू केले. त्यावेळी दोनजण घरामध्ये उचकापाचक करत असल्याचे दिसले. दुकानावर दरोडा पडल्याचे लक्षात येताच अभिजीत समदडिया यांनी गिरीशशेठ समदडिया, नीरज समदडिया, महावीर संचेती, अमोल पारेख यांना घटना कळविली.

पोलिसांना माहिती दिली असता पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे जवळच रात्रगस्त घालत होते. त्यामुळे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी आले. पोलिसांची चाहूल लागताच पाच दरोडेखोर ऐवज घेऊन शेजारच्या इमारतीच्या गच्चीवर गेले. तर दोन चोरटे आलेल्या मार्गाने पळून गेले. बाजारपेठेतील नागरिक, काजीपुरा येथील तरुण तसेच परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने मदतीसाठी येऊन परिसराला वेढा घातला. गिरीशशेठ समदडिया यांच्या इमारतीच्या गच्चीवर लपलेल्या पाच दरोडेखोरांना पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडे कोयता, कटावणी, गॅस कटर, गॅस गन व एक बनावट पिस्तूल मिळाले आहे.

वैभव बाळू रोकडे (वय 24 रा. नागाचा खडक मुरबाड), गणेश रामचंद्र टोके(वय 26 रा. नडे ता. मुरबाड), अजय सखाराम भिसे ( वय20 रा. कलगाव ता. शहापूर) ग्यानसिंग भोला वर्मा (वय 23 रा. घोडबंदर रोड ठाणे) व मोहम्मद अरमान दर्जी (वय 23 रा. नेहरूनगर कुर्ला) यांना पोलिसांनी मुद्देमालासह पकडले आहे. इतर दोघे फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी सकाळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस पथकाच्या या कामगिरीबद्दल त्यांनी अभिनंदन केले आहे. पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे, पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलीस कर्मचारी तानाजी हगवणे, नंदकुमार आढारी, होमगार्ड फैजल खान, अर्जुन ठोंबरे यांनी ही कामगिरी केली आहे. यश व जैना समदडिया यांच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे. यश याच्या हाताला करकचून बांधल्याने दुखापत झाली आहे.चोरटे सव्वा तास समदडिया यांच्या घरात ठाण मांडून होते.स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता याबद्दल पोलिसांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत.

 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी