शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

खडकवासल्यात सोनेरी आमदारांच्या पुत्रापेक्षा राष्ट्रवादीचे दाेडके श्रीमंत; तापकीर, दोडकेंच्या तुलनेत वांजळे उच्चशिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:11 IST

भाजपचे भीमराव तापकीर बारावी पास, सचिन दोडगे दहावीपर्यंत तर मयुरेश वांजळे उच्चशिक्षित असून बीई (सिव्हिल) झाले आहेत

पुणे: खडकवासला मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत होणार असून, उमेदवारांमध्ये भाजपचे भीमराव तापकीर, सोनेरी आमदार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत रमेश वांजळेंचे सुपुत्र मनसेचे मयूरेश वांजळे यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दाेडके हे अधिक श्रीमंत असल्याचे शपथपत्रावरून स्पष्ट झाले आहे. तापकीर यांच्याकडे १४ कोटी ९४ लाख १४ हजार ४०६ रुपये, तर सचिन दोडके यांच्याकडे ५७ कोटी ८३ लाख ४५ हजार ४१८ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या तुलनेत वांजळे ८४ लाख ६३ हजार ७६३ रुपयांचे धनी आहेत. तापकीर, दोडके यांच्या तुलनेत वांजळे हे उच्चशिक्षित आहेत.

महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर 

एकूण मालमत्ता - १४ कोटी ९४ लाख १४ हजार ४०६ रुपये. (जंगम - स्वत:कडे १ कोटी ८९ लाख ७९ हजार ५८८, तर पत्नीकडे ३३ हजार ८४ हजार ८१८ रुपयांची मालमत्ता आहे. स्थावर - स्वत:कडे १० कोटी १३ लाख ५० हजार रुपये, तर पत्नीकडे २ कोटी ५७ लाख रुपयांची मालमत्ता आहे.)कर्ज - स्वत:च्या नावे १ लाख ७५ हजार ५६५ रुपये, तर पत्नीच्या नावे ५७ लाख ३७ हजार ६६५ रुपये.

राेख - स्वत:कडे २ लाख १० हजार रुपये, तर पत्नीकडे १ लाख ५ हजार रुपये.व्यवसाय - शेती

शिक्षण - बारावी पासवाहने व दागिने - स्वत:कडे ३० लाख रुपयांची टोयाटो इनोव्हा गाडी, २०० ग्रॅम साेने; तर पत्नीकडे ३२० ग्रॅम सोने आहे, तसेच धनकवडी येथे ४ सदनिका, कात्रज व आंबेगाव बुद्रुक येथे अनुक्रमे दोन सदनिका आहेत. धनकवडी येथे ६१ हजार ५०० चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. तापकीर यांची जांभळी गट नंबर येथे ४ एकर १७ आर, तर पत्नीची ७ एकर १७ आर शेतजमीन आहे.)

राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके

एकूण मालमत्ता - ५७ कोटी ८३ लाख ४५ हजार ४१८ रुपये (स्थावर - स्वत:कडे ५६ कोटी ९१ लाख १३ हजार १५३ रुपये, तर पत्नीकडे २२ लाख ८ हजार रुपये.)व्यवसाय - शेती व बांधकाम

कर्ज - ४ कोटी ८३ लाख ९१ हजार ६१३ रुपये.राेख - स्वत:कडे ५ लाख ५८ हजार रुपये, तर पत्नीकडे २ लाख १० हजार रुपये आहेत.

दागिने - स्वत:कडे ४४ ग्रॅम वजनाचे ३ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, पत्नीकडे ५०० ग्रॅमचे ३९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व १ लाख रुपयांची १ किलो चांदी आहे.शिक्षण - दहावीपर्यंत

वाहने - २ चारचाकी आणि २ दुचाकी असून, त्याची किंमत ३८ लाख ४८ हजार ८८ रुपये आहे.

मनसेचे उमेदवार मयूरेश वांजळे

एकूण मालमत्ता - ८४ लाख ६३ हजार २८६ रुपये. (जंगम - स्वत:च्या नावे १९ लाख २९ हजार २३३ रुपये, तर स्थावर - ६५ लाख ३४ हजार ०५३ रुपयांची मालमत्ता आहे.)वाहने व दागिने - ९६ लाख रुपयांचे १२० तोळे सोने, १ टोयाटो चारचाकी आणि दोन दुचाकी अशा १० लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत.

कर्ज - १ कोटी २८ लाख रुपये.शिक्षण - बीई (सिव्हिल)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४khadakwasala-acखडकवासलाbhimrao tapkirभीमराव तापकिरMNSमनसेMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी