इंदापूरात पोलिसांनी तब्बल ४९ लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2022 16:55 IST2022-06-15T16:54:31+5:302022-06-15T16:55:02+5:30
ट्रकमध्ये एकूण ५० बॉक्स गुटखा, किंमत २४ लाख ७५ हजार व व दहा चाकी ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला

इंदापूरात पोलिसांनी तब्बल ४९ लाखांचा गुटखा पकडला
इंदापूर : लोणी देवकर (ता.इंदापूर) परिसरामध्ये इंदापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने रात्रीच्या वेळी नाकाबंदी दरम्यान कर्नाटक येथून मुंबईच्या दिशेने निघाला होता. हा संशयित ट्रक ताब्यात घेऊन गाडीतील मालाची तपासणी केली असता गाडीमध्ये तंबाखु मिश्रीत गुटखा आढळुन आला. सदरच्या ट्रकसह गाडीतील माल इंदापूर पोलिसांनी जप्त केला.
जप्त केलेल्या ट्रकमधील मालाची दोन पंचासमक्ष पाहणी केली. ट्रकमध्ये एकूण ५० बॉक्स गुटखा, किंमत २४ लाख ७५ हजार व व दहा चाकी ट्रक असा एकूण ४९ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त केला आहे. सदर ट्रक चालक व मालक यांच्याविरुद्ध कलम ३२८ व इतर कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.