शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Suicide: इंदापूरात सावकाराच्या त्रासाला कंटाळून युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2022 14:45 IST

खासगी सावकारकीने आणखी एका युवकाचा जीव घेतल्याने नागरीकांतुन सावकाराच्या प्रति संताप व्यक्त होत आहे.

बाभुळगाव (ता.इंदापूर) : खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून इंदापूर शहरातील ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गूरूवार पहाटे पाच वाजता उघडकीस आली. विशाल दत्तात्रय गवळी (वय ३०, रा.नेताजीनगर,चाळीस फुटी रोड, इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत युवकाचे चुलते उत्तम अंकुश गवळी (वय४९) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विशाल गवळी यांने आत्महत्या करण्यापुर्वी खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहुन ठेवली होती. ती चिठ्ठी पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतली आहे. विशाल याने राहत्या घरात गरूवारी पहाटे पाचच्या सुमारास खोलीतील भिंतीला लावलेल्या एका काँक्रिट खिळ्याला सुताच्या दोरीने गळफास घेतला. सदरची घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी त्याच्या गळ्यातील फास सोडवून उपचारासाठी उपजिल्हा रूग्णांलयामध्ये दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. तर खासगी सावकारकीने आणखी एका युवकाचा जीव घेतल्याने नागरीकांतुन सावकाराच्या प्रति संताप व्यक्त होत आहे.

'सावकाराने त्रास दिल्यानेच करतोय आत्महत्या', चिठ्ठीत नमूद  ''एका खासगी सावकाराकडून पन्नास हजार रूपये व्याजाने घेतले होते. सदरचे पैसे सावकाराला परत दिले होते. तरीही सावकाराने आमच्यावर केस केली. सदर पैसे देताना सावकाराने चेक व नोटरी करून घेतली आहे. त्याने खूप त्रास दिल्याने आत्महत्या करीत असल्याचे विशालने चिठ्ठीत लिहीले आहे.'' 

टॅग्स :IndapurइंदापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू