Baramati: प्रशासकीय भवनासमोरच शेतकऱ्याने घेतले पेटवून; बारामतीतील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 13:03 IST2023-06-05T13:01:23+5:302023-06-05T13:03:03+5:30
या घटनेने बारामती परिसरात खळबळ उडाली...

Baramati: प्रशासकीय भवनासमोरच शेतकऱ्याने घेतले पेटवून; बारामतीतील धक्कादायक घटना
बारामती (पुणे) : बारामती शहरातील प्रशासकीय भवनासमोर प्रवेशद्वारातच एकाने रॉकेल ओतून पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ५) सकाळी ११.१५ च्या सुमारास घडला. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
संबंधित शेतकरी रेडणी (ता. इंदापूर) येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. रोहिदास जनार्दन माने असे पेटवून घेतलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जमीनीच्या वादातून न्याय न मिळाल्याची त्याची तक्रार आहे. यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.
मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा मिळाला नाही. घटनेनंतर प्रांताधिकारी वैभव नावडकर, पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमीला शहरातील सिलव्हर जुबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.