शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

बारामतीत ‘ते’ स्वत:च भयभीत झालेत; राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांचा राष्ट्रवादीला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 15:55 IST

ठळक मुद्दे- - २०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार - कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही

बारामती (पुणे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात काम करण्याची पद्धत बदलली आहे. बारामतीत ज्यांच्या भितीची चर्चा होते, ते स्वत: भयभीत झाले आहेत. आमच्यासोबत राहिला नाहीत तर विकास होऊ न देण्याची भीती दाखवली जात आहे. ताकदीचा काहींना गर्व होता, विकासकामांत भेदभाव केला जात होता. चेहरा पाहून कामे करण्याची वेळ आता गेली आहे, असा टोला केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता लगावला.

बारामती लोकसभा मतदारसंघात लवकरच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा दुसरा दौरा होणार आहे. या दौऱ्याच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभुमीवर पटेल यांचा लोकसभा मतदारसंघात दोन दिवसीय दौरा पार पडला. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राम शिंदे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, दिलीप खैरे, अविनाश मोटे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके ,शिवाजी निंबाळकर, अभिराज देवकाते आदी उपस्थित होते.

२०२४ ला बारामतीत भाजपचा खासदार-

येथील भाजप कार्यलयात भाजप कार्यकर्ता मेळाव्यात पटेल बोलत होते. पटेल पुढे म्हणाले, अत्यंत कठीण परिस्थितीतून भाजप हा पक्ष पुढे आला आहे. आज देशभर पक्षाचा विजय रथ दौडतो आहे. देशातील अनेक राज्यात भाजप किंवा भाजप सहयोगी पक्षाचे सरकार आहे. २०२४ ला बारामतीतून कोणत्याही परिस्थितीत भाजपचा खासदार निवडून जाईल. भयमुक्त बारामती बनविण्याचा संकल्प याचवेळी पूर्णत्वाला जाईल. त्या खासदाराला जिल्हाधिकारी जेव्हा विजयी झाल्याचे प्रमाणपत्र देतील ते प्रमाणपत्र येथील जनतेच्या भयमुक्तीचे प्रमाणपत्र असेल. भयमुक्त तर तुम्ही त्यापूर्वीच झालेला असाल. परंतु प्रमाणपत्रामुळे त्यावर शिक्कामोर्तब झालेले असेल, असे पटेल म्हणाले.

कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही-

भाजपमध्ये केंद्रीय अध्यक्षपासून ते शहराध्यक्षापर्यंतच्या कोणत्याही पदावर सामान्य व्यक्तीला संधी मिळू शकते. इतर पक्षांमध्ये अशी नेतृत्व बदलाची ताकद नाही. आम्ही कधीही पक्ष पाहून विकासकामे करत नाही. कोणत्या जाती-धर्माचे सरकार आहे हे बघत नाही. जी योजना आणतो ती समाजातील प्रत्येक गरजूला मिळाली पाहिजे, याचा विचार भाजपकडून केला जातो.

'मविआने उत्तर दिले पाहिजे'-

महाराष्ट्रात ३८ टक्के जनेतला नळाद्वारे पाणी मिळत होते. २०१९ ला जलजीवन मिशनची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी २०२२ ला ही आकडेवारी ७१ टक्क्यांवर गेली. दुसरीकडे शेजारील गोवा राज्यात भाजपचे सरकार होते. तेथे १०० टक्के नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळाले. महाराष्ट्रात हे का घडू शकले नाही, याचे उत्तर मागील महाविकास आघाडी सरकारने द्यावे, असा टोला देखील पटेल यांनी लगावला.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळे