शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Wari: ऊन - पावसाचा आनंद घेत वैष्णवांचा मेळा पंढरीकडे; तुकोबांच्या पालखीचा लोणी काळभोरला मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 19:59 IST

पावसाच्या सरीसोबत वारकरी 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोष करीत सायंकाळी साडे पाचच्या सुमारास लोणी काळभोर कदमवाकवस्ती येथील कवडीपाट येथे दाखल झाला

लोणी काळभोर(पुणे ) : पुणे शहरातील मुक्काम उरकून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) पुणे सोलापूर महामार्गाहून पंढरपूरच्या दिशेने निघाली. तुरळक पावसाच्या सरी तर मधेच पडणारे ऊन याचा आनंद घेत जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मंगळवारी (दि.२) संध्याकाळी सातच्या सुमारास लोणी काळभोरच्या कदमवाकवस्तीच्या पालखी स्थळावर विसावला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने रविवार (दि.३०)आणि सोमवारी (दि. १)असे दोन दिवस पुण्यात मुक्काम केला. (Ashadhi Wari)

पुणेकरांचा पाहुणचार घेऊन पालखी सोहळा मंगळवारी सकाळी सात वाजता लोणीकाळभोरकडे मार्गस्थ झाला. या सोहळ्याने सकाळचा गारवा आणि ढगाळ वातावरणात पहिला विसावा हडपसरमध्ये घेतला. दुपारचा विसावा पालखीने साडे तीनच्या सुमारास मांजरी फार्म येथे घेतला. पावसाच्या सरीसोबत वारकरी 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोष करीत सायंकाळी साडे पाचच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील कवडीपाट येथे दाखल झाला. यावेळी कवडीपाट टोलनाक्याजवळ लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक सदस्यांनी पालखीचे स्वागत केले. लोणी स्टेशन चौकात फटाक्याच्या अतिशबाजीत पालखीचे स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी पालखीच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. फराळाची व्यवस्था मंगळवारी एकादशी असल्याने वारकऱ्यांना स्वयंसेवी संस्था, मंडळांकडून फराळाचे वाटप करण्यात येत होते. 'माउली फराळ करून जावा', अशी प्रेमाची हाक पालखी मार्गावरील नागरिक वारकऱ्यांना देत होते. तसेच ठिकठिकाणी वारकऱ्यांना राजगिऱ्याची चिक्की, लाडूचे वाटप करण्यात येत होते.

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाSocialसामाजिकPandharpurपंढरपूरdehuदेहूRainपाऊसashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022