रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे- मुंबई दरम्यानच्या १५ रेल्वे साेमवारपर्यंत रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 11:48 IST2022-11-19T11:47:20+5:302022-11-19T11:48:10+5:30

१९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या १५ रेल्वे रद्द...

Important news for railway passengers! 15 trains between Pune and Mumbai canceled till Monday | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे- मुंबई दरम्यानच्या १५ रेल्वे साेमवारपर्यंत रद्द

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! पुणे- मुंबई दरम्यानच्या १५ रेल्वे साेमवारपर्यंत रद्द

पुणे :रेल्वेच्यामुंबई विभागातर्फे दि. १९ आणि २० नोव्हेंबर रोजी तांत्रिक कामामुळे मेगा ब्लॉक घोषित केला आहे. त्यामुळे दि. १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या आणि येणाऱ्या १५ रेल्वे रद्द केल्या आहेत, अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

यात शनिवारी (दि. १९) धावणाऱ्या पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८), कोल्हापूर - मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस (१७४१२) आणि रविवारी धावणाऱ्या मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२७), मुंबई - पुणे डेक्कन एक्स्प्रेस (११००७), मुंबई - पुणे सिंहगड एक्स्प्रेस (११००९), मुंबई - पुणे प्रगती एक्स्प्रेस (१२१२५), मुंबई - पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (१२१२३), मुंबई - कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस (१७४११), पुणे - मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (११०१०), पुणे - मुंबई डेक्कन क्वीन (१२१२४), पुणे - मुंबई प्रगती एक्स्प्रेस (१२१२६), पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (११००८), पुणे - मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२८); तर सोमवारी धावणारी मुंबई - पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (१२१२७) रद्द झाली. यात १८ आणि १९ नोव्हेंबर रोजी दादरपर्यंतच धावणारी रेल्वे पुणे - मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस (२२१०६) ही रद्द केली आहे.

Web Title: Important news for railway passengers! 15 trains between Pune and Mumbai canceled till Monday