शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! फळपिक विमा योजनेंतर्गत सहभाग नोंदवण्यासाठी विमा पोर्टल सुरू

By नितीन चौधरी | Updated: June 7, 2023 17:39 IST

एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा राहील

पुणे : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत मृग बहारातील अधिसूचित फळपिकांची विमा नोंदणी करण्यासाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टल http://pmfby.gov.in  सुरु करण्यात आले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे,असे आवाहन कृषि आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक डि. बी. पाटील यांनी केले आहे.

मृग बहारमध्ये संत्रा,मोसंबी, डाळिंब,चिकू, पेरु, लिंबू, सिताफळ व द्राक्ष (क) या ८ फळपिकांसाठी अधिसूचित करण्यात आलेल्या २६ जिल्ह्यांमध्ये हवामान धोक्यांच्या निकषानुसार  फळपिक विमा योजना राबविण्यात येते. योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी ज्या बँकेमध्ये पिककर्ज खाते अथवा किसान क्रेडिट कार्ड खाते आहे तिथे अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर जमा करणे आवश्यक आहे.  कर्जदार शेतकऱ्यांनाही घोषणापत्र देणे आवश्यक राहील. जे कर्जदार शेतकरी विहित मुदतीत सहभागी होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत ते सहभागी आहेत असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांना विमा हप्ता विहित पद्धतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.

सोलापूर जिल्ह्यासाठी  रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (ग्राहक सेवा क्र. १८००१०२४०८८ , दूरध्वनी क्रमांक ०२२-६८६२३००, ईमेल आयडी rgicl.maharashtraagri@relianceada.com), सातारा एचडीएफसी अग्रो जनरल इन्शुरन्स कं.लि. (ग्राहक सेवा क्र. १८००२६६०७००, दूरध्वनी क्रमांक ०२२-६२३४६२३, ईमेल आयडी pmfby.maharashtra@hdfcegro.com) आणि पुणे जिल्ह्यासाठी   भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, (ग्राहक सेवा क्र. १८००४१९५००४, दूरध्वनी क्रमांक ०२२-६१७१०९१, ईमेल आयडी-pikvima@aicofindia.com) या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी मृग व आंबिया बहार मिळून जास्तीत जास्त ४ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा राहील. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. 

शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्यासाठी फळपिकनिहाय अंतिम मुदत देण्यात आली आहे. संत्रा, द्राक्ष, पेरु व लिंबू या फळपिकासाठी १४ जून २०२३, मोसंबी, चिकूसाठी ३० जून, डाळिंबासाठी १४ जुलै व सिताफळासाठी ३१ जुलै २०२२ हा विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत राहील.

मृग बहारातील अधिसूचित फळपिकांचे हवामान धोके, विमा संरक्षित रक्कम, विमा संरक्षण कालावधी, विमा हप्ता याबाबतच्या सविस्तर माहितीसाठी दिनांक १८ जून २०२१ रोजीचा शासन निर्णय http://www.maharashtra.gov.in तसेच कृषि विभागाच्या http://www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित विमा कंपनीचे जिल्हा, तालुका कार्यालय  अथवा कृषि विभागाच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारfruitsफळेvegetableभाज्या