बारामतीकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 19:48 IST2023-01-13T19:47:13+5:302023-01-13T19:48:43+5:30
बारामतीकरांना नोंद घेण्याचे आवाहन...

बारामतीकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद
बारामती (पुणे) :बारामती शहरात शनिवारी (दि. १४) आणि सोमवारी (दि. १६) दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने ही माहिती देण्यात आली.
बारामती नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्र येथील तांत्रिक बिघाड व साठवण तलावातील अपुरा पाणीसाठा यामुळे शनिवार, व सोमवारी बारामती शहर हद्दीमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. रविवारी (दि. १५) ला पाणीपुरवठा होणार असून मंगळवार (दि १७) पासून पाणीपुरवठा दैनंदिन सुरु होईल. बारामतीकरांनी या होणाऱ्या बदलाची नोंद घ्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.