शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांची महत्वपूर्ण घोषणा: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नवीन गावांचा समावेश करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 14:46 IST

पिंपरी-चिंचवड शहरात विकासकामे करताना वाईटपणा स्वीकारावा लागला...

ठळक मुद्देमहापालिकेची होणार हद्दवाढ

पिंपरी : पुणे महापालिकेत काही गावांचा समावेश केला असून, त्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड महापालिकेतही लगतच्या गावांना घ्यायचे आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. त्यामुळे महापालिकेच्या हद्दीत वाढ होणार आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे चिंचवड येथे शुक्रवारी कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पवार बोलत होते. महापाैर उषा ढोरे, मावळचे आमदार सुनील शेळके, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, गावांचे मिळून पिंपरी-चिंचवड शहर तयार झाले. येथील विकासकामे करताना वाईटपणा स्वीकारावा लागला. पुणे-मुंबई महमार्गाचे रुंदीकरण करताना अनेक घरे हटविण्यात आले. तत्कालीन आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचेही घर काढले. विकासकामांसाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महापालिकेतील गैरकारभाराची चर्चा होत असते. त्याबाबत आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे, त्यानंतर चाैकशी करता येईल. 

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांवर नजरशहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. सर्वांनी खबरदारी घेऊन कोरोनामुक्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांवर नजर आहे. प्रवाशांनी प्रशासनाला सहकार्य करावे. स्वत: पुढे येऊन माहिती द्यावी. कोरोनामुक्तीकडे वाटचाल होत असतानाच बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. 

महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायदागुन्हेगारांवर कारवाई झाली पाहिजे. त्यासाठी आवश्यकतेनुसार काही कायद्यांमध्ये बदल करण्याची सरकारची तयारी आहे. राज्यातील महिला, मुली सुरक्षित राहण्यासाठी शक्ती कायदा तयार करण्याच्या विचार सुरू आहे. त्याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे  अजित पवार या वेळी म्हणाले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडAjit Pawarअजित पवारshravan hardikarश्रावण हर्डिकरBJPभाजपाElectionनिवडणूक