शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

कंत्राटी वीज कामगार संपावर, थकबाकी वसुलीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 8:06 AM

महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार कामगार या संपात सहभागी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या कंपन्यांतील कंत्राटी वीज कामगारांनी विविध मागण्यांसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून दोन दिवस, तर ५ मार्चपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. कामगारांच्या संयुक्त कृती समितीसोबत कामगार आयुक्त व तिन्ही कंपन्यांची बैठक निष्फळ ठरल्यामुळे हे कंत्राटी कामगार संपावर गेले आहेत. महावितरणच्या पुणे परिमंडलातील सुमारे दीड हजार कामगार या संपात सहभागी झाले आहेत. या संपाचा महावितरणच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. 

तिन्ही वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर कंत्राटी कामगारांना सामावून घ्या, कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, कंत्राटी कामगारांच्या एकूण पगारात १ एप्रिलपासून ३० टक्के वाढ करा, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफरशींची तातडीने अंमलबजावणी करा, कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षांपर्यंत कंत्राटदारविरहित शाश्वत रोजगार द्या, अशा या कामगारांच्या मागण्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास संपाचा इशारा देण्यात आला होता. 

त्यानुसार सोमवारी कामगार आयुक्त, तिन्ही कंपन्या व वीज कंत्राटी कामगारांच्या संयुक्त कृती समितीमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली. त्यानंतर कामगारांनी संपावर जाण्याचा निर्धार केला. राज्यातील तिन्ही वीज कंपन्यांमध्ये सध्या ४२ हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यातील महावितरण’च्या पुणे परिमंडलातील १ हजार ४५० कामगारांचा समावेश आहे; तर महापारेषणमधील ८० कामगार सहभागी आहेत.

टॅग्स :mahavitaranमहावितरण