शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
2
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
3
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
4
छपाई महाग; दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
5
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
6
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
7
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
8
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
9
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
10
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
11
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पत्नीला तिसर्‍या मजल्यावरुन ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:39 PM

नवीन फ्लॅट बुक करण्याचा बहाणा करून पतीनेच पत्नीचा इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून ढकलून तिचा खून केल्याचा प्रकार चर्‍होली (ता. खेड) या ठिकाणी घडला. 

ठळक मुद्देयाप्रकरणी पतीसह अन्य दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करून अटकदेविदासचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याची माहिती मंदाला लागल्याने त्यांच्यात सतत भांडण होत.

शेलपिंपळगाव : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पत्नीला नवीन फ्लॅट बुक करण्याचा बहाणा करून पतीने इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून ढकलून दिले. यामध्ये पाथर्डीच्या मंदा देविदास पालवे (वय २८) या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पतीसह अन्य दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्याद मयत मंदा पालवे यांचा भाऊ आदिनाथ गोरक्ष खेडकर (रा. चिंचपूरी हिझवे, ता. पाथर्डी, जि. नगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चर्‍होली खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत घडली. आरोपी देविदास पालवे आणि मृत मंदा पालवे हे नगर जिल्ह्यातील पती-पत्नी असून देविदास याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याची माहिती पत्नी मंदा हिला लागल्याने त्यांच्यात सतत भांडण होत होते. आरोपीने मंदा पालवे यांना आपण फ्लॅट घेवून राहू, असे सांगून आळंदीत आणले. आळंदी जवळील चर्‍होली खुर्दच्या एका सोसायटीत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे पालवे पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले रात्रभर मुक्कामी राहिले. त्यानंतर सकाळी दोघेही चर्‍होलीतील नातेवाईकांच्या सोसायटीजवळच नवीन सुरू असलेले फ्लॅटचे बांधकाम पाहण्यासाठी गेले. मात्र तेथे कुलूप असूनही कुणाची परवानगी न घेता त्यांनी इमारतीत प्रवेश करून सर्वजण पाचव्या मजल्यावर गेले. मात्र पुन्हा खाली येताना पत्नीला देविदासने तिसर्‍या मजल्यावरून खाली ढकलून दिले. या घटनेत पालवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परंतु आरोपी देविदासने ती पाय घसरून पडली असा बहाणा करत जखमी पत्नीला उपचारासाठी भोसरीतली खासगी रूग्णालयात नेले. मात्र तेथे पोचल्यावर पालवे यांचा मृत्यू झाला. दरम्यान आदिनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी देविदास पालवे आणि घुले यांनी अटक केली. तर अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस