शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

'पे अँड पार्क' सुविधेतून ठेकेदारांची बेकायदा वसुली ;  महापालिकेने पाठवल्या नोटीसा  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 4:59 PM

'पे अँड पार्क' सुविधेतून ठेकेदारांची बेकायदा वसुली ;  महापालिकेने पाठवल्या नोटीसा  

पुणे : शहराच्या विविध भागांमध्ये महापालिकेकडून ठेकेदारी पद्धतीने पे अ‍ॅन्ड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. परंतु यातील अनेक ठिकाणी ठेकेदारांकडून वाहनतळाबाबत घातलेल्या अटी व शर्तींचे उल्लघंन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काही वाहनतळांची पाहणी केली. यामध्ये महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारणे, सीसीटीव्ही कॅमेरे न लावणे, महापालिकेच्या निविदांमध्ये घातलेल्या अटींचा भंग करण्यात आल्याचे लक्षात आले. याबाबत मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी सर्व ठेकेदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. 

याबाबत मुठे यांनी सांगितले की, शहरामध्ये सुमारे ८ ते १० ठिकाणी महापालिकेकडून पे अ‍ॅन्ड पार्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया राबवून खासगी ठेकेदारांना या जागा पार्किंगसाठी चालविण्यास देण्यात आल्या आहेत. परंतु निविदामध्ये घातलेल्या अनेक अटी व शर्तींचा ठेकेदारांकडून भंग होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा शहरातील सर्व पार्किंग ठेकेदारांना नोटिसा देऊन वाहनतळांची वार्षिक देय रक्कम त्वरित भरणे, कर्मचाºयांना आयकार्ड देणे, नागरिकांशी गैरवर्तन केल्यास कर्मचाºयांवर कारवाई करणे, वाहनतळाची नियमित स्वच्छता करणे आदी अनेक सूचना केल्या आहेत. 

संगणकीकृत पावती नाहीच !

शहरातील सर्व पे अ‍ॅन्ड पार्कच्या ठिकाणी पार्किंग शुल्क वसुली पावत्यांचे संगणकीकरण करणे बंधनकारक आहे. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी छापील पावत्या दिल्या जातात. यामध्ये इन व आऊट टाईमचा उल्लेख नसतो. तसेच पावतीवर ठेकेदारांचे नाव व फोन नंबर देणेदेखील आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना काही तक्रार असल्यास थेट ठेकेदारांशी संपर्क करता येईल. यामुळे शहरातील सर्व पे अ‍ॅन्ड पार्कच्या ठिकाणी संगणकीकरण करुन घेण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत. 

टॅग्स :Parkingपार्किंगPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका