शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

चास गावातील अवैध दारूधंदे प्रकरण चिघळले :  तरुणावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 6:39 PM

खेड तालुक्यातील चास ग्रामसभेने संपूर्ण दारूबंदी केलेले प्रकरण मंगळवारी चिघळले. दारूधंदा नष्ट करण्यासाठी पुढे असणाऱ्या महिलेच्या मुलावर सोमवारी (दि.२०) रात्री  प्राणघातक हल्ला करण्यात आला.

पुणे (राजगुरूनगर) : खेड तालुक्यातील चास ग्रामसभेने संपूर्ण दारूबंदी केलेले प्रकरण मंगळवारी चिघळले. दारूधंदा नष्ट करण्यासाठी पुढे असणाऱ्या महिलेच्या मुलावर सोमवारी (दि.२०) रात्री  प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात गणेश चासकर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गाव दहशतीखाली असल्याच्या भावना ग्रामस्थानी व्यक्त केल्या.  चास गावात संपूर्ण दारूबंदीचा ठराव महिलांनी ग्रामसभेत एकमुखी केला होता. त्यानुसार गावात दारूबंदी होणे आवश्यक होते. तसे घडले नाही. गावात अवैध दारूविक्री सुरूच राहिली आणि ग्रामस्थांचा विरोधही. यातून अवैध दारूविक्री करणारे आणि ग्रामस्थ यांच्यात वाद आणि धुसफूस सुरू होती. या वादास दोन दिवसांपूर्वी पुन्हा तोंड फुटले. काही महिला व तरुणांनी पुढे होत एक दारूधंदा नष्ट केला. यामध्ये दडवलेले दारूचे कॅन बाहेर काढून फोडण्यात आले. या घटनेवेळी दारू विक्री करणाऱ्या महिला व ग्रामस्थ यांच्यात वाद झाला. या वादाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणानुसार वाद किती विकोपाला गेले, हे निदर्शनास आले. फुटेजनुसार संपूर्ण गावाला ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती.  चासमधील अवैध दारू धंद्यांविरोधात आवाज उठविणा-या महिलेच्या मुलावर मध्यरात्री पावणे दोनच्या सुमारास अज्ञातांनी हल्ला केला. गणेश सोपान चासकर हा जखमी झाला. घनवटवाडी रस्त्यालगतच्या मोठ्यावर झोपलेला असताना त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण चास गावातील ग्रामस्थ  त्यामुळे संतप्त व भयग्रस्त झाले आहेत. हे प्रकरण चिघळून मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.  हल्ला हातभट्टी दारू विक्री करणा-या महिलांनीच केला व त्यांनी दिलेली धमकी खरी केली अशी चर्चा  गावात आहे.या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. हे प्रकरण पाहता ग्रामस्थ संतप्त झाले असून हे प्रकरण चिघळले आहे. तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांत फिर्याद देण्यात आली असून अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.संजय मुळूक, ग्रामस्थ :गावात दारूबंदीचा ठराव आहे. तरीही गावात अवैध दारूविक्री सुरू आहे. गावात विविध अकरा ठिकाणी दारू विकली जाते. तरुण, शाळकरी मुले दारूच्या आहारी गेल्याचे दिसते. हा प्रकार खेदजनक आहे. खेड पोलीस ठाणे ते पोलीस अधीक्षक, आयुक्त आणि थेट मुख्यमंत्री यांच्यापर्यंत चासच्या दारूबंदी व दारूविक्रीचा विषय गेलेला आहे. तरीही अवैध दारूविक्री सुरूच असल्याचे दुर्दैव आहे.         

असा आहे घटनाक्रम :*  ग्रामसभा घेऊन महिलांनी केला चासला दारूबंदीचा ठराव.* ठराव करूनही अवैध दारूविक्री सुरूच* अकरा ठिकाणी दारू विक्री होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप* दारूविक्रीकरून ग्रामस्थांध्ये तीव्र संताप* दारूप्रकरण चिघळले; तरुणावर वार, गाव दहशतीखाली

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाKhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस