Pimpri Chinchwad Crime: ‘जिथे भेटशील तिथेच तुला मारून टाकतो’ कोयत्याने वार करून धमकी
By नारायण बडगुजर | Updated: October 12, 2023 16:41 IST2023-10-12T16:41:44+5:302023-10-12T16:41:53+5:30
शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी....

Pimpri Chinchwad Crime: ‘जिथे भेटशील तिथेच तुला मारून टाकतो’ कोयत्याने वार करून धमकी
पिंपरी : कोयत्याने वार करून तरुणाला जखमी केले. त्यानंतर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दि. १०) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
साहिल म्हाळसकर, मयूर मते (रा. तळेगाव दाभाडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शुभम अनिल भोसले (२६, रा. तळेगाव दाभाडे) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम भोसले हे त्यांची आई आणि पत्नी यांच्यासोबत घरी होते. त्यावेळी साहिल म्हाळसकर आणि मयूर मते हे फिर्यादी भोसले यांच्या घरी आले. त्यांनी दरवाजा वाजवून आवाज दिला. फिर्यादी भोसले हे दरवाजा उघडून बाहेर गेले असता साहिल याने कोयता काढून फिर्यादी भोसले यांच्यावर वार केले. यात फिर्यादी भोसले जखमी झाले. त्यांनतर मयूर याने फिर्यादी भोसले यांना, तसेच त्यांच्या पत्नी आणि आईला देखील शिवीगाळ केली. ‘तू जिथे आम्हाला भेटशील तिथेच तुला मारून टाकतो’ अशी धमकी देऊन साहिल आणि मयूर हे दोघेही गाडीवरून निघून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.