शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जीवनात पुढे जायचं असल्यास वैज्ञानिक भूमिका स्विकारावी, पवारांनी दिला जीवनमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 15:41 IST

तुम्हाला ज्यावेळी प्रत्यक्ष या केंद्रास भेट द्यायची संधी मिळेल त्यावेळी माझी खात्री आहे की तुमच्या ज्ञानात आणि औत्सुक्यात भर पडेल.

मुंबई - बारामती येथे आज सायन्स ॲण्ड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विज्ञानाचे महत्व आणि गरज यासंदर्भात मार्गदर्शन केलं. एक अतिशय महत्त्वाचा आणि तुम्हा सर्वांना आयुष्यात उपयोगी पडणारा, विज्ञानाप्रति सर्वांमध्ये एक आस्था निर्माण करणारा हा प्रकल्प ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टने हाती घेतला आणि फार थोड्या दिवसात हा प्रकल्प पूर्णत्वास आल्याचे त्यांनी सांगितले. 

तुम्हाला ज्यावेळी प्रत्यक्ष या केंद्रास भेट द्यायची संधी मिळेल त्यावेळी माझी खात्री आहे की तुमच्या ज्ञानात आणि औत्सुक्यात भर पडेल. जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचे असेल तर वैज्ञानिक भूमिका स्वीकारावी लागेल. भाकड समजुती, खोटेपणा या गोष्टींनी व्यक्तीचे मन तयार होत नाही आणि विज्ञानावर आधारीत ज्ञान घेऊन मानसिकता तयार करण्याची काळजी आपण घेतली तर जीवनात तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा जीवनमंत्रच त्यांनी आपल्या भाषणातून दिला. या केंद्राला तुम्ही भेट द्याल तेव्हा विज्ञानाने किती चमत्कार केले आहेत हे तुम्हाला पाहायला मिळेल, असेही ते म्हणाले.    आपण अनेकदा वाचतो. माणूस आता मंगळावर जातोय, चंद्रावर जातोय. चंद्र काय, मंगळ काय इथपर्यंतचा प्रवास माणूस सहज करतोय हा एक प्रचंड बदल आहे. हा बदल केवळ विज्ञानामुळे होऊ शकला. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टी तयार होणे, विज्ञानाच्या आधारे विचार करण्याची भूमिका मनामध्ये तयार होणे आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात विज्ञानाला सोबत घेऊन पुढे यश मिळवायची भूमिका ठरवणे, हे सगळे करण्याची आवश्यकता आहे. त्याचा पाया म्हणजे तुमची मानसिकता विज्ञानासंबंधी विकसित झाली पाहिजे. 

प्रकल्प पाहून तुमचा आत्मविश्वास वाढेल

माझी खात्री आहे की त्यासाठी इथले केंद्र तुम्हा सगळ्यांना उपयोगी पडेल. राजेंद्र पवार, त्यांचे सर्व सहकारी, प्राध्यापक वर्ग या सगळ्यांनी कष्ट केले आणि एक अतिशय देखणा प्रकल्प आज याठिकाणी उभा केला. हा प्रकल्प पाहिल्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल व तुम्हाला समाधान लाभेल.विज्ञानासंबंधीचे आकर्षण तुम्हाला अखंड राहील. त्यासाठी हा प्रकल्प तुम्हा सगळ्यांना प्रोत्साहन देईल. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहात व तुमच्यातील काहींनी हा प्रकल्प पाहिला. ज्यांनी पाहिला नाही ते पुढील दिवसात निश्चितच हा प्रकल्प पाहतील हा विश्वास व्यक्त करतो. 

आजच्या या कार्यक्रमाला काकोडकर व गौतम अदानी व सौ. अदानी हे अगत्याने आले व या कार्यक्रमाला त्यांनी प्रोत्साहित केले. त्यामुळे त्यांना मी धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील तसेच देशातील वैज्ञानिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, नेहरू सायन्स सेंटर असेल, नेहरू सेंटर असेल अशा विज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अनेक संस्था व त्या संस्थांचे प्रमुख शास्त्रज्ञ आज याठिकाणी व्यासपीठावर आहेत ही आपल्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे, असे म्हणत पवारांनी सर्वांचे आभार मानले.  

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAdaniअदानीBaramatiबारामतीscienceविज्ञान