शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ब्राह्मण उमेदवारालाच संधी द्या - भगरे गुरुजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 12:31 IST

कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकरांनी हेमंत रासनेंचा पराभव करत भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसकडे आणला

पुणे : राज्यात विधानसभेच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाली आहे. मागील पोटनिवडणुकीत पुण्यातील बहुचर्चित कसबा विधानसभेने सर्वांचे लक्ष वेधले होते. आताही कसब्याबाबत केलेल्या अतुल भगरे गुरुजींच्या वक्तव्याने या मतदारसंघात खळबळ उडाली आहे. कसबा पोटनिवडणुकीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर ब्राह्मण उमेदवारालाच संधी द्या असं भगरे गुरुजी म्हणाले आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. 

 पुण्यातील कसबा मतदारसंघात ब्राह्मण समाजाचे मोठे प्राबल्य असल्याची चर्चा आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनाने गेल्या वर्षी कसबा मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली होती. त्यावेळी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासनेंचा पराभव केला होता. हेमंत रासनेंना उमेदवारी दिल्याने सकल ब्राह्मण समाज नाराज झाल्याची प्रतिक्रिया पेठांमधून येत होती. पेठेतील अनेकांनी माध्यमांशी बोलताना थेट वक्तव्य केलं होत. त्यानंतर धंगेकर कसब्यातून निवडून आले. तब्बल २५ वर्षांहूनही अधिक काळ भाजपचा बालेकिल्ल असणारा कसबा मतदारसंघ काँग्रेसकडे आला.

आता मात्र उमेदवार ब्राह्मण समाजाचा असावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष भालचंद्र कुलकर्णी यांनीसुद्धा उमेदवारीबाबत ब्राह्मण समाजाच्या उमेदवाराची मागणी केली आहे. कसबा पाठोपाठ राज्यातील ब्राह्मण बहुल असलेल्या किमान ३० मतदारसंघात असे उमेदवार देण्यात यावे अशी सुद्धा मागणी समाजाकडून करण्यात आली आहे. कसब्यातून धीरज घाटे, हेमंत रासने, कुणाल टिळक हे उमेदवार इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु पक्ष कोणाला उमेदवारी देणार याबाबत अजूनही काहीच निर्णय झाला नाहीये. मागील पोटनिवडणुकीत कसब्यातून धंगेकर यांना साथ मिळाली होती. मात्र लोकसभेला सगळ्यात कमी मतदान याच विधानसभेतून धंगेकरांना झाले होते. त्यामुळे त्यांच्यासमोरही हा बालेकिल्ला काँग्रेसकडे राखून ठेवणं हे आव्हानात्मक असणार आहे.      

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kasba-peth-acकसबा पेठMukta Tilakमुक्ता टिळकravindra dhangekarरविंद्र धंगेकरvidhan sabhaविधानसभाPoliticsराजकारणbrahman mahasanghब्राह्मण महासंघ